गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड स्टार रणवीर सिंग त्याचा आगामी 'सिनेमा 83'च्या शूटिंगमध्ये लंडनमध्ये बिझी होता. या चित्रपटामध्ये तो भारताच्या क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. कपिल देव यांच्या भूमिकेसाठीही रणवीर प्रचंड मेहनत घेत आहे. एवढंच नाहीतर या भूमिकेसाठी त्याने आपल्या आवडत्या अनेक गोष्टींचा त्यागही केला आहे.
या चित्रपटात ताहिर राज भसीन सुनील गावस्करांच्या भूमिकेत, एमी ब्रिक बलविंदर संधूंच्या भूमिकेत, तमीळ अभिनेता जीवा कृष्णामचारी श्रीकांत यांच्या भूमिकेत, चिराग पाटील संदीप पाटील यांच्या भूमिकेत, आदिनाथ कोठारे दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत, धैर्य करवा रवी शास्त्री यांच्या भूमिकेत आणि साहिल खट्टर सैयद यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना १० एप्रिल २०२० पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.