Join us

पुणे सोडून मुंबईत शिफ्ट झाला राकेश बापट; पाहा त्याच्या आलिशान घराची एक झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 16:39 IST

Raqesh bapat: राकेश आणि त्याची एक्स पत्नी रिद्धी डोंगरा यांचा घटस्फोट झाल्यानंतर राकेश पुण्याला शिफ्ट झाला होता. तसंच पुन्हा मुंबई न येण्याचाही त्याने निर्णय घेतला होता.

तरुणींच्या गळ्यातलं ताईत असलेला अभिनेता म्हणजे राकेश बापट (raqesh bapat). उत्तम अभिनयासह गुड लुकिंगमुळे कायम चर्चेत राहणारा राकेश अलिकडेच बिग  बॉस या रिअॅलिटी शोमध्ये झळकला होता. या शोमध्ये त्याचं आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी यांचं रिलेशनशीप चांगलंच गाजलं. विशेष म्हणजे आजही ही जोडी चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असते. यामध्येच आता राकेशच्या नव्या घराची चर्चा रंगली आहे. बरीच वर्ष पुण्यात राहिल्यानंतर राकेशने आता मुंबईत त्याचं हक्काचं घर खरेदी केलं आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या राकेशने अलिकडेच त्याच्या घराचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो बाल्कनीत उभा असून या खिडकीतून दिसणाऱ्या मुंबईचा एक नजारा त्याने दाखवायचा प्रयत्न केला आहे. त्याच्या या नव्या घराचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोसह त्याने एक पोस्टही शेअर केली आहे.

शेअर केलेल्या फोटोमध्ये राकेशने काळ्या रंगाचा टी शर्ट आणि जीन्स परिधान केली आहे. तसंच राकेश खास गर्लफ्रेंड शमिता शेट्टीसाठी मुंबईत शिफ्ट झाला असंही काही जणांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राकेश आणि त्याची एक्स पत्नी रिद्धी डोंगरा यांचा घटस्फोट झाल्यानंतर राकेश पुण्याला शिफ्ट झाला होता. तसंच पुन्हा मुंबई न येण्याचाही त्याने निर्णय घेतला होता. मात्र, आता शमिताच्या सांगण्यावरुन तो मुंबईत परतल्याचं म्हटलं आहे. राकेशने मुंबईत यावं अशी शमिताची इच्छा होती.

टॅग्स :राकेश बापटटेलिव्हिजनसेलिब्रिटी