Join us

रश्मी आगडेकरने 'नगमा'च्या माध्यमातून दिल्ली-लाहोरच्या संस्कृतीची करून दिली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 6:44 PM

रश्मीने तिचा लघुपट नगमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

रश्मी आगडेकर एक बॉलिवूड अभिनेत्री आहे आणि तिने आपल्या अभिनयाद्वारे स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. रश्मी आगडेकर यांनी ऑल्ट बालाजी यांच्या 'देव डीडी' या वेब सीरिजमधून डिजिटल माध्यमात पदार्पण केले आहे आणि 'अंधाधुन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. रश्मीने कित्येक वेब सिरीजमध्ये आपला ठसा उमटवला आहे, 'रसभरी'च्या शिवाय 'इम्मुच्युअर' सिरीजमध्ये सुद्धा काम केले आहे.  नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'देव डीडी २'मधील लेस्बियन भूमिका साकारून तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

रश्मी आगडेकर एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे आणि तिच्या शैलीमध्ये पडद्यावर ती व्यक्तिरेखेत सुंदर भूमिका साकारत आहे, ह्या व्यतिरिक्त रश्मी एक प्रशिक्षित शास्त्रीय नर्तक देखील आहे. अभिनेत्री रश्मी सोशल मीडियावर खूप सक्रीय असून ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात आहे. 

नुकतेच रश्मीने तिचा लघुपट नगमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात नगमा नामक महिलेची कथा सांगितली आहे. या व्हिडिओद्वारे दिल्ली-लाहोरची विसरलेली डिश, पंरपरा, संस्कृती आणि दोन भिन्न ठिकाणी समान नाती सामायिक केल्या आहेत.

"लाहौर की ईद मुझे संवरती है दिल्ली, या हृदयस्पर्शी संवादात सानिका देवडीकर आणि अवंती देवडीकर यांच्या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून परंपरा आणि संस्कृतीबद्दल सांगण्यात आले आहे आणि जयच्या आवाजात ही शॉर्टफिल्म परिपूर्ण करण्यात आले आहे. 

रश्मी आगडेकर सध्या बर्‍याच प्रोजेक्टवर काम करत असून याबद्दल लवकरच ती घोषणा करणार आहे.

टॅग्स :अंधाधुन