Join us  

'पुष्पा २'च्या श्रीवल्लीचा पहिला लूक आला समोर, चित्रपटाच्या सेटवरचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 11:01 AM

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये रश्मिका मंदान्नाचा श्रीवल्ली लूक पाहायला मिळतोय.

अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun)ने 'पुष्पा: द राइज' (Pushpa The Rise) या चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.  तेव्हापासून चाहते 'पुष्पा'च्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते.  'पुष्पा २' हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा: द राइज'चा सीक्वल आहे, या चित्रपटात रश्मिका मंदान्नाने श्रीवल्लीची भूमिका केली होती. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्नाची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती.  दुसऱ्या भागातही ती तिच भूमिका पुन्हा साकारणार आहे. 'पुष्पा २'(Pushpa 2)चे शूटिंग सुरू झालं आहे. अल्लू अर्जूनचा लूक रीलिज झाल्यानंतर चाहते रश्मिका मंदानाच्या लूकची प्रतीक्षा करत होते. रश्मिका या चित्रपटात कशी दिसणार हे चाहत्यांना पाहायचं होतं. आता चाहत्यांची इच्छा पुर्ण झाली आहे. 

 'पुष्पा २'च्या सेटवरचा रश्मिका मंदानाचा व्हिडीओ समोर आला आहे. यात तिचा श्रीवल्लीचा लूक पाहायला मिळतोय. 'पुष्पा २'मधील रश्मिका मंदानाचा लूक रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहत्यांची उत्कंठा वेगळ्याच पातळीवर आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये  श्रीवल्ली फेम रश्मिका लाल साडी, भरजरी दागिने, केसात गजरा असा सुंदर आणि पारंपरिक दाक्षिणात्य लूकमध्ये पाहायला मिळाली. श्रीवल्लीच्या रुपात रश्मिकाला पाहताच चाहते तिच कौतुक करताना थकत नाही आहेत. रश्मिकाच्या या व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

'पुष्पा: द राइज' २०२१ मध्ये रिलीज झाला आणि त्या वर्षातील सर्वात मोठा व्यावसायिक ब्लॉकबस्टर ठरला. आता चाहत्यांना ४०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'पुष्पा २' ची प्रतीक्षा आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. पहिल्या भागाच्या प्रचंड यशानंतर दिग्दर्शक सुकुमार यांनी आपल्या प्रेक्षक वर्गाला खिळवून ठेवण्यासाठी स्क्रिप्टवर बरेच काम केले आहे. 'पुष्पा'चा पहिला भाग प्रदर्शित होण्यापूर्वीच दिग्दर्शक सुकुमार यांनी चित्रपटातील काही दृश्ये शूट केली होती. पण नंतर त्यांनी चित्रपटाच्या कथेत काही बदल केले आणि आता त्या अनुषंगाने 'पुष्पा २' पुन्हा शूट करण्यात येत आहे. 

टॅग्स :रश्मिका मंदानाअल्लू अर्जुनसेलिब्रिटीसिनेमा