Join us

Rashmika Mandanna : "मी रडत होते, ओरडत होते..."; Animal मधील सीननंतर रश्मिकाला कंट्रोल झाले नाहीत इमोशन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 11:26 AM

Rashmika Mandanna : अभिनेत्रीने संदीप रेड्डी वांगाच्या चित्रपटातील एका सीनचा आवर्जून उल्लेख करताना सांगितलं की, तिच्या अभिनयाने ती स्वत:ही आश्चर्यचकित झाली आहे.

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित अ‍ॅनिमल या चित्रपटासाठी रश्मिका मंदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अ‍ॅनिमलचं सक्सेस एन्जॉय करणाऱ्या रश्मिका मंदानाने नुकतीच एक मुलाखत दिली, जिथे अभिनेत्रीने संदीप रेड्डी वांगाच्या चित्रपटातील एका सीनचा आवर्जून उल्लेख करताना सांगितलं की, तिच्या अभिनयाने ती स्वत:ही आश्चर्यचकित झाली आहे. जेव्हा ती रणबीर कपूरने साकारलेलं पात्र रणविजयला कानाखाली मारत होती, तेव्हा तिला डायरेक्टरच्या एक्शन आणि कट म्हणण्यामध्ये नेमकं काय घडलं ते आठवत नाही. 

सीन एका टेकमध्ये शूट

रश्मिका मंदानाने अलीकडेच पिंकवीलाला एक मुलाखत दिली, जिथे अभिनेत्रीने सांगितलं की सीन शूट करण्यापूर्वी, ती यामध्ये नेमकं काय करणार आहे हेच तिला समजत नव्हतं. पण सीन शूट करण्यापूर्वी वांगाने तिला काय सांगितलं होतं ते तिला आठवतं. यानंतर संपूर्ण सीन एका टेकमध्ये शूट करण्यात आला. 

"मी सीन शूट केल्यानंतर रडत होते"

"संदीपने मला सांगितलं की, अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला काय वाटेल, तेच फील कर. मला फक्त हेच आठवत आहे. एक्शन आणि कट म्हणण्यामध्ये नेमकं काय घडलं ते मला आठवत नाही. मी प्रोसेसच करू शकले नाही. माझं डोकं ब्लँक झालं होतं. मी सीन शूट केल्यानंतर रडत होते. कारण मी त्याला कानाखाली मारली, मी ओरडत होते..." 

"मोठा शॉट एका टेकमध्ये पूर्ण करू शकल्याचा आनंद"

"मी मग रणबीरकडे गेले आणि त्याला विचारलं की ठीक आहे ना? तू ठीक आहेस का? त्यानंतर संदीपलाही नीट परफॉर्म केलं का, असा प्रश्न विचारला. मी 8-9 मिनिटांचा मोठा शॉट एका टेकमध्ये पूर्ण करू शकल्याचा मला आनंद झाला आणि 'अ‍ॅनिमल' चित्रपटात काम केल्याने तिला अभिनयात आणखी यश मिळालं आहे" असं देखील रश्मिकाने म्हटलं आहे. 

टॅग्स :रश्मिका मंदानारणबीर कपूर