अभिनयाव्यतिरिक्त शेवंता करते हा व्यवसाय,वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 06:52 PM2021-08-30T18:52:36+5:302021-08-30T18:52:50+5:30
अपूर्वा नेमळेकरने 'आभास हा' या मालिकेतून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं होतं. पण 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतून तिला प्रचंड पसंती मिळाली.
कलाकार मंडळी मालिका आणि सिनेमात अभिनय करण्याबरोबरच इतर गोष्टींमध्येही विशेष लक्ष देऊ लागले आहेत. अभिनयासह स्वतःचा बिझनेस सुरु करण्याचा हा ट्रेंड आता मराठी कलाकरांमध्येही रुढ झाला आहे. तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे या दोन मराठमोळ्या अभिनेत्रींनी स्वतःचे फॅशन ब्रँड तयार केले. तसेच अभिनेत्री प्रिया मराठे हिने मुंबईतील मिरा रोड या ठिकाणी स्वतःचं कॅफे सुरु केले आहे. प्रिया बेर्डे यांनीही स्वतःचे हॉटेल सुरु केले आहे. या सगळ्या अभिनेत्रींप्रमाणे शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकरनेही अभिनयाशिवाय काही तरी हटके करण्याचा प्रयत्न केला आहे. अभिनया व्यतिरिक्त स्वतःचा व्यवसायही तिने सुरु केला आहे.
अपूर्वानं 'आभास हा' या मालिकेतून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं होतं. पण 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतून तिला प्रचंड पसंती मिळाली. अल्पावधीतच या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं होतं. मालिकेप्रमाणे कलाकारही रसिकांचे आवडते बनले होते. अपूर्वासुद्धा रसिकांची तितकीच आवडती अभिनेत्री बनली. शेवंताच्या अदांनी फक्त अण्णाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र घायाळ झाला. शेवंता या व्यक्तिरेखेच्या एंट्री नंतर मालिकेने वेगळच वळण घेतलं होतं.
'रात्रीस खेळ चाले' मालिकेत झळकण्याआधी तिने आपल्या व्यवसायाची सुरवात केली होती.आर्टिफिशिअल ज्वेलरी आणि साड्यांचा ती व्यवसाय करते. सातारा येथे अपूर्वा कलेक्शन नावाने तिचा हा व्यवसाय प्रसिद्ध आहे. अपूर्वा आपल्या बिझी शेड्युल मधून वेळ काढून आवर्जुन हजेरी लावते. या व्यवसायाने आता चांगलाच जम बसवलेला पाहायला मिळतो.
अपूर्वा नेमळेकर उर्फ शेवंता सोशल मीडियावरही चाहत्यांच्या संपर्कात असते. अभिनयाप्रमाणे तिच्या सौंदर्यावरही चाहते फिदा होतात. ऑनस्क्रीन जितकी सोज्वळ तितकी खऱ्या आयुष्यात ग्लॅमरस आहे. हटके स्टाइलसाठीही अपूर्वा ओळखली जाते. दिवसेंदिवस हटके स्टाईल करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.
अपूर्वा सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत आपले सुंदर - सुंदर फोटो शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर नजर टाकल्यास अपूर्वाचे मोहक, ग्लॅमरस, स्टायलिश अवतारातील फोटो पाहायला मिळतात. सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सची संख्याही अधिक आहे.