Join us

 रवीना टंडन स्वीकारणार का ‘केजीएफ 2’ची ऑफर?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 2:03 PM

‘केजीएफ 2’ साठी बॉलिवूडचा मुन्नाभाई अर्थात संजय दत्त याच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. आता संजय पाठोपाठ रवीना टंडन हिलाही या चित्रपटासाठी विचारणा झाल्याची खबर आहे.

ठळक मुद्देरवीनाने हा चित्रपट स्वीकारलाच तर ‘केजीएफ 2’ हा कन्नड सिनेसृष्टीतील तिचा कमबॅक चित्रपट असेल. यापूर्वी ‘उपेंद्र’ या टॉलिवूडच्या चित्रपटात रवीना झळकली होती.

गतवर्षी प्रदर्शित झालेल्या ‘केजीएफ’ या कन्नड चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर धूम केली. कन्नडसह तेलगू, तामिळ, मल्याळम आणि हिंदी अशा पाच भाषेत हा चित्रपट रिलीज झाला.  या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननेही बक्कळ कमाई केली.  दिग्दर्शक प्रशांत नील दिग्दर्शित या चित्रपटात कन्नड सुपरस्टार यश मुख्य भूमिकेत होता. डिसेंबरमध्ये रिलीज झालेला ‘केजीएफ’ हा या चित्रपटाचा पहिला भाग होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग अर्थात चार्प्टर 2  लवकरच  प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ताज्या बातमीनुसार, येत्या उन्हाळ्यात ‘केजीएफ 2’चे शूटींग सुरु होत आहे आणि यात बॉलिवूड कलाकारांना घेण्याचे मेकर्सचे प्लानिंग आहे. या दुस-या भागासाठी बॉलिवूडचा मुन्नाभाई अर्थात संजय दत्त याच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. आता संजय पाठोपाठ रवीना टंडन हिलाही या चित्रपटासाठी विचारणा झाल्याची खबर आहे.

ही बातमी खरी ठरलीच आणि रवीनाने हा चित्रपट स्वीकारलाच तर ‘केजीएफ 2’ हा कन्नड सिनेसृष्टीतील तिचा कमबॅक चित्रपट असेल. यापूर्वी ‘उपेंद्र’ या टॉलिवूडच्या चित्रपटात रवीना झळकली होती. यात ती साऊथ स्टार उपेन्द्रसोबत दिसली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजयने ‘केजीएफ 2’साठी होकार कळवलाआहे. अर्थात याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. ‘केजीएफ’ हा चित्रपट शाहरूख खानच्या ‘झिरो’सोबत प्रदर्शित झाला होता.

त्यामुळे बॉक्स ऑफिसवर थेट ‘केजीएफ’ विरूद्ध ‘हिरो’ अशी लढत पाहायला मिळाली होती. विशेष म्हणजे, या लढाईत शाहरूखला मात देत ‘केजीएफ’ अव्वल ठरला होता. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने ४५ कोटींचा घसघशीत बिझनेस केला होता. 

 

टॅग्स :रवीना टंडनसंजय दत्त