बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रविना टंडन ( Raveena tandon). आजवरच्या कारकिर्दीत रविनाने अनेक सुपरहिट सिनेमाबॉलिवूडला दिले आहेत. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये तिने तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. रविना उत्तम अभिनयासह तिच्या रोखठोक वक्तव्यांमुळेही कायम चर्चेत येत असते. यात अलिकडेच तिने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर भाष्य केलं आहे.
'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' या कार्यक्रमामध्ये रविनाने बॉलिवूडविषयी काही खुलासे केले. इतकंच नाही तर इंडस्ट्रीमधील घराणेशाही अर्थात नेपोटिझमवरही भाष्य केलं आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच तिने या मुद्दावर भाष्य केलं आहे. त्यामुळे उपस्थितांच्या नजरा तिच्याकडे वेधल्या गेल्या.
नेमकं काय म्हणाली रविना?
रविनाला नेपोटिझ्मविषय़ी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देतांना, "जर तुम्ही नेपो किड्सबद्दल बोलत असाल तर आमचं अर्ध पॉलिटिक्स आणि इंडस्ट्री यातच संपेल", असं रविना म्हणाली. यावेळी तिने तिच्या करिअरविषयीदेखील भाष्य केलं.
पुढे ती म्हणते, "मुलांच्या संगोपनामध्ये आईचा मोठा वाटा असतो. मला सुरुवातीच्या काळात अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत होत्या. मात्र, मी सतत चित्रपटांसाठी नकार देत होते. मला अभिनयामध्ये काहीच रस नव्हता. मुळात मला दिग्दर्शनामध्ये जायचं होतं. त्यामुळे मी चित्रपटांना नकार देत होते. मी कधीच अभिनय करण्याचा विचारही केला नव्हता."