Join us

औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेणाऱ्या ओवैसींचं Raveena Tandonकडून समर्थन? ट्वीट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 3:49 PM

एमआयएमचे नेते अकबरूद्दीन ओवैसी यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेत नव्या वादाला तोंड फोडलं होतं. आता पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon ) हिचं एक ट्वीट व्हायरल होतेय.

एमआयएमचे नेते अकबरूद्दीन ओवैसी यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेत नव्या वादाला तोंड फोडलं होतं. महाराष्ट्रभर यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आता पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon ) हिचं एक ट्वीट व्हायरल होतेय. रवीनाच्या या ट्वीटची सध्या जोरदार चर्चा आहे.लेखक आनंद रंगनाथन यांचं ट्वीट शेअर करत, रवीनानं यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही सहनशील आहोत, होतो आणि राहू. भारत एक स्वतंत्र देश आहे आणि इथे कोणालाही कोणाचीही पूजा करता येते. इथे सर्वांना समान अधिकार आहेत,’असं तिने तिच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

यापुढच्या ट्वीटमध्ये ती लिहिते, ‘काळी काळापूर्वी माझ्या देशाला असहिष्णू असं लेबल लावणं एक फॅशन झाली होती. यावरून आपण किती सहनशील आहोत आणि किती सहन करू शकतो, हे सिद्ध होतं. हे एक उदाहरण आहे. मग असहिष्णुता आहे कुठे?’

लेखक आनंद रंगनाथन यांनी औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवण्यासाठी गेलेले एमआयएमचे आमदार अकबरूद्दीन ओवेसी यांचे फोटो शेअर करत, त्यावर टीका केली होती. ‘गुरू तेग बहादूर यांचा शिरच्छेद करणाऱ्या, संभाजी महाराजांचा शिरच्छेद करणाऱ्या, काशी उद्ध्वस्त करणाऱ्या आणि 4.9 दशलक्ष हिंदूंची हत्या करणाऱ्या राक्षसाच्या कबरीवर जाऊन माथा टेकणं हे चिथावणीखोर मनोरूग्ण कृत्य आहे,’असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. त्यांच्या याच ट्वीटवर रवीनानं उत्तर दिलं आहे. अलीकडे रवीना ‘केजीएफ 2’ या चित्रपटात दिसली होती.

टॅग्स :रवीना टंडनऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन