Join us

'गुलाबी साडी' गाण्याची रवी जाधवच्या बायकोला पडली भुरळ, चक्क अंडरवॉटर केला डान्स, व्हिडीओ चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 13:04 IST

Ravi Jadhav And Meghana Jadhav : दिग्दर्शक रवी जाधवची पत्नी मेघना जाधव हिलादेखील 'गुलाबी साडी' गाण्याची भुरळ पडली आहे. एवढेच नाही तर तिने आपल्या मैत्रिणींसोबत अंडरवॉटर या गाण्यावर रिल बनवला आहे आणि हा रिल रवी जाधवने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सध्या सोशल मीडियाचा जमाना असून त्यावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील नवनवीन व्हिडीओ आणि गाणी व्हायरल होताना दिसतात. सध्या संजू राठोड आणि प्राजक्ता घाग यांचे 'गुलाबी साडी' (Gulabi Saree) हे गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या गाण्यावर व्हिडीओ रिल्स बनवत आहेत. तसेच या गाण्यावर कलाकार मंडळीही रिल्स बनवत आहेत. दरम्यान आता प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव(Ravi Jadhav)ची पत्नी मेघना जाधव (Meghana Jadhav) हिलादेखील या गाण्याची भुरळ पडली आहे. एवढेच नाही तर तिने आपल्या मैत्रिणींसोबत अंडरवॉटर या गाण्यावर रिल बनवला आहे आणि हा रिल रवी जाधवने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

रवी जाधवने सोशल मीडियावर मेघना जाधवचा गुलाबी साडी गाण्यावरचा रिल शेअर केला आहे, ज्यात ती मैत्रिणींसोबत स्कूबा डायव्हिंग करत पाण्याच्या आत या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत रवी जाधवने लिहिले की, मेघना आणि तिच्या मैत्रिणींचा अंडरवॉटर मराठी ठसका. इंडोनेशियातील राजा अंपट बेटातील पाण्याखाली नाचताना दुसऱ्या जगात गेल्यासारखे वाटते. या दमदार गाण्यासाठी संजू राठोड तुझे आभार. या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसत आहे.    

रवी जाधव आणि मेघना यांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. मेघना म्हणजे रवी जाधवच्या जवळच्या मित्राची बहीण. मित्राच्या घरी येणं-जाणं वाढल्यानंतर त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेला रवी जाधवने मेघनाला लग्नाची मागणी घातली होती. होकार देण्यापूर्वी मेघनाने पूर्ण १ महिना विचार केला होता. यानंतर सासरेबुवांनी घातलेल्या अटीनुसार प्रचंड मेहनत करून मुंबईत घर घेतले आणि मेघनाशी लग्नगाठ बांधली. या जोडप्याला आता एक मुलगा आहे.

टॅग्स :रवी जाधव