Join us

'त्याने मला रात्री कॉफी प्यायला बोलवले अन्...', रवी किशनने 'मायानगरी'ची केली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 4:18 PM

भोजपुरी सुपरस्टार रवी किशनलाही आलाय कास्टिंग काऊचचा अनुभव

Ravi Kishan : मनोरंजन विश्वात कास्टिंग काऊच हा प्रकार काही नवीन नाही. अनेक कलाकारांना कास्टिंग काऊचचा अनुभव आला आहे. यामध्ये भोजपुरी अभिनेता रवी किशन यांचंही नाव आहे. रविकिशनने नुकतीच रजत शर्मा यांच्या 'आप की अदालत' कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी मायानगरीची पोलखोल केली.

फिल्मइंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा अनुभव आला आहे का यावर रविकिशन म्हणाले, 'होय, असं झालंय आणि जे इंडस्ट्रीत होत आलंय. पण मी कसंतरी तिथून पळून आलो. प्रामाणिकपणे काम कर अशी माझ्या वडिलांनी मला शिकवण दिली होती. मी कधीच शॉर्टकट घेत नाही. मला माहित होतं की माझ्यात टॅलेंट आहे.'

'रात्री कॉफी प्यायला बोलवले'

रवी किशन म्हणाले, 'मी त्या व्यक्तीचं नाव घेऊ शकत नाही कारण आता ती प्रसिद्ध व्यक्ती आहे. त्याने मला एकदा सांगितले, रात्री कॉफी प्यायला ये. मी विचार केला की कॉफी तर दिवसा घेतली जाते. मला तेव्हाच इशारा मिळाला आणि मी नकार दिला.'

रवी किशन यांनी हिंदी, भोजपुरी, तेलुगू अशा भाषांतील सिनेमात काम केले आहे. त्यांनी करिअरच्या सुरुवातीला अतिशय संघर्ष केला. 1992 मध्ये 'पीतांबर' या सिनेमात रविकिशन यांनी काम केले होते आणि बॉलिवूडला एक टॅलेंटेड चेहरा मिळाला. त्यांना भोजपुरी सिनेमाचे सुपरस्टार म्हणतात. 'आर्मी', 'हेरा फेरी', 'तेरे नाम', 'लक' या बॉलिवूड सिनेमांमध्ये भूमिका केली आहे. तसेच नेटफ्लिक्सवरील 'खाकी: द बिहार चॅप्टर' मध्येही त्यांनी काम केले आहे.

टॅग्स :रवी किशनकास्टिंग काऊचबॉलिवूड