Join us

अरेच्चा याला काय झाले, लोकप्रिय अभिनेत्याला तुम्ही तरी ओळखले का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 11:24 AM

वाढलेले वजन, चेह-यावर वाढलेली दाढी आणि अंगात निळ्या रंगाच्या लूकमध्ये अभिनेत्याचा फोटो पाहून अनेकांना त्याला ओळखणे कठिण जात आहे.

वाढलेले वजन, चेह-यावर वाढलेली दाढी आणि अंगात निळ्या रंगाच्या लूकमध्ये रवी किशनचा फोटो पाहून अनेकांना त्याला ओळखणे कठिण जात आहे. चाहते त्याचा हा लूक पाहून डॅशिंग लूक म्हणत त्याचे कौतुक करत आहेत. रवी किशनचा मेकओव्हर चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरत असून एका प्रोजक्टसाठी त्याने त्याच्या लूकमध्ये बदल केला आहे. 

 

आगामी क्राइम आधारित मालिका 'मौका-ए-वारदात'साठी भोजपुरी मेगास्‍टार रवी किशन झकणार आहे.  'मौका-ए-वारदात' ही क्राइम मालिका आहे. ही मालिका रहस्‍यमय गुन्‍हेगारी घटनांवर आधारित आहे.  ज्‍या प्रेक्षकांच्‍या मनाला विचलित करतील आणि त्‍यांना 'वास्‍तव कल्‍पनेपेक्षा अपरिचित आहे' या वाक्‍यावर विश्‍वास ठेवण्‍यास भाग पाडतील. काही कालावधीपासून टेलिव्हिजनपासून दूर असलेला रवी किशन पुनरागमन करत आहे.

 

या मालिकेबाबत सांगताना रवी म्‍हणाले, ''मला या मालिकेचा भाग होण्‍याचा आनंद झाला आहे. मी विविध गुन्‍हेगारी केसेसना दाखवणार आहे. या केसेस वास्‍तविक घटनांमधून प्रेरित आहेत आणि सर्वात अकल्‍पनीय गुन्‍ह्यांच्‍या विविध कथांना दाखवतात. तसेच गुन्‍ह्यामागील रहस्‍य, हेतू व पद्धतींना सादर करतात. क्राइम आधारित मालिकांनी माझे नेहमीच लक्ष वेधून घेतले आहे. 

मी अशा मालिकांना लक्षवेधक व माहितीपूर्ण मानतो. यामुळे मला आपल्‍या अवतीभोवती घडणा-या गुन्‍ह्यांचे प्रकार आणि आपण त्‍याबाबत कशाप्रकारे जागरूक व दक्ष राहू शकतो, याबाबत समजते. या शैलीवर आधारित अनेक मालिका बनवण्‍यात आल्‍या आहेत, पण माझ्या मते 'मौका-ए-वारदात' ही इतरांपेक्षा वेगळी मालिका आहे.

 

सविस्‍तरपणे संकल्‍पना जाणून घेतल्‍यानंतर मला समजले की, मालिकेमध्‍ये विश्‍वासापलीकडील अविभाज्‍य व अविश्‍वसनीय गुन्‍हेगारी कथांची नवीन वेगळी संकल्‍पना आहे, जी लोकांच्‍या मनात प्रश्‍न निर्माण करेल की 'हे असे-कसे झाले?' प्रेक्षक क्राइम मालिका पाहतात तेव्‍हा त्‍यांच्‍या मनात 'हे कसे घडले', 'हे कोणी केले' आणि 'पुढे काय घडेल' असे प्रश्‍न निर्माण होतात.

पण ही मालिका त्‍यांना 'हे कशाप्रकारे घडले' यापेक्षा 'हे कोणी केले' विचारण्‍यास भाग पाडेल. मी मालिका सुरू होण्‍यास अत्‍यंत उत्‍सुक आहे. मालिकेसाठी अथक मेहनत घेण्‍यात आली आहे आणि अर्थातच यामध्‍ये सर्व प्रेक्षकांचे प्रेम, पाठिंबा व आपुलकी आहे.''

टॅग्स :रवी किशन