ठळक मुद्देआधी या चित्रपटासाठी सुशांत सिंग राजपूतचे नाव फायनल झाले होते. त्याच्यासोबतचे चित्रपटाचे पहिले पोस्टरही लॉन्च झाले होते. पण नंतर डेट्सच्या अडचणीमुळे ऐनवेळी सुशांतने या चित्रपटातून अंग काढून घेतले.
बॉलिवूडचा अॅक्शन स्टार जॉन अब्राहमचा ‘रोमिओ, अकबर, वॉल्टर (रॉ)’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. १९७१ च्या युद्धातील एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जॉन अब्राहम वेगवेगळ्या लूकमध्ये दिसतोय. चर्चा खरी मानाल तर, जॉन यात १८-२० अशा वेगवेगळ्या रूपात दिसणार आहे. कधी पोलिसाच्या, कधी एका जखमी व्यक्तिच्या रूपात जॉनच्या चेहºयावरचे भाव पाहण्यासारखे आहेत. मौनी रॉय आणि जॅकी श्रॉफ यांच्याही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ट्रेलरमध्ये त्यांची झलक पाहायला मिळते. २.४६ मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये जॉन एका गुप्तहेराची भूमिका साकारताना दिसतोय. तुम्हीही ट्रेलर पाहा आणि कसा वाटला ते नक्की कळवा.
जॉनचा हा चित्रपट एका ख-या भारतीय गुप्तहेराच्या आयुष्यावर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानच्या सैन्यात सामील होऊन या गुप्तहेराने भारतीय सैन्यासाठी काम केले होते. रॉबी गरेवाल यांनी ‘रोमिओ, अकबर, वॉल्टर (रॉ)’ या चित्रपटाची पटकथा लिहिली. तेच या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. यापूर्वी त्यांनी व्हेन टाइम स्ट्राइक्स , एम पी3: मेरा पहला पहला प्यार आणि आलू चाट सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.‘रोमिओ, अकबर, वॉल्टर (रॉ)’ हा चित्रपट येत्या ५ एप्रिलला रिलीज होतोय. आधी या चित्रपटासाठी सुशांत सिंग राजपूतचे नाव फायनल झाले होते. त्याच्यासोबतचे चित्रपटाचे पहिले पोस्टरही लॉन्च झाले होते. पण नंतर डेट्सच्या अडचणीमुळे ऐनवेळी सुशांतने या चित्रपटातून अंग काढून घेतले आणि हा चित्रपट जॉनच्या झोळीत पडला.