Join us  

बॉलिवूड चित्रपटांच्या कोटय़वधींच्या कमाईचे वास्तव

By admin | Published: October 29, 2014 12:05 AM

डिसेंबरमध्ये नववर्षाच्या मुहूर्तावर आमीर खानचा ‘पीके’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याआधीच पीके वेगवेगळ्या कारणाने चर्चेत राहिला.

अनुज अलंकार - मुंबई
डिसेंबरमध्ये नववर्षाच्या मुहूर्तावर आमीर खानचा ‘पीके’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याआधीच पीके वेगवेगळ्या कारणाने चर्चेत राहिला. आता मात्र वेगळ्या कारणाने इंडस्ट्रीत त्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. भारतातल्या चित्रपटगृहांमध्ये जवळजवळ पाच हजार प्रिंट्समध्ये हा चित्रपट एकाचवेळी प्रदर्शित केला जाणार आहे. याचा अर्थ असा की भारतातल्या तीन चतुर्थाश म्हणजेच निम्म्यापेक्षा जास्त चित्रपटगृहांमध्ये फक्त पीकेच बघितला जाईल अशी सोय केली आहे. यावरून त्याची कमाई किती होईल याचा सहज अंदाज बांधता येऊ शकतो. जाणकारांच्या मते, अशा स्थितीत पहिल्याच दिवशी चित्रपट 5क् कोटींच्या आसपास कमाई करेल आणि आठवडय़ाभरात हीच कमाई 2क्क् कोटींवर पोहोचेल. ज्या चित्रपटांनी याआधी 2क्क् कोटी क्लबमध्ये स्थान मिळवले आहे त्यांचा रेकॉर्ड हा चित्रपट सहज मोडून नवा रेकॉर्ड प्रस्थापित करेल, असेही सांगितले जात आहे. 
या वर्षी साडेचार हजार प्रिंट्समध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये नुकत्याच प्रदर्शित झालेल्या शाहरूखच्या ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटाचे नाव घेता येईल. त्यापाठोपाठ हृतीकचा ‘बँग बँग’ आणि सलमानचा ‘किक’ चित्रपटही अशा प्रकारे प्रदर्शित झाला होता. या चित्रपटांनी प्रदर्शनाच्या दिवशी चित्रपटगृहांमधले तिकीट दर वाढवले. त्यामुळे साहजिकच चित्रपटांनी कोटय़वधींची कमाई केली. यामुळे एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते ती म्हणजे, अशी कोटय़वधींेची कमाई व्हावी यासाठी सामान्य प्रेक्षकांच्या खिशातूनच पैसे जातात. प्रदर्शनाच्या दिवशी तिकिटाचे दर वाढवणो आणि त्यातून मग चित्रपटांनी एवढय़ा कोटींची कमाई केल्याचा डिंगोरा पिटणो यातून या कमाईचे खरे सत्य समोर येते. हेच कमाईचे खरे सत्य आहे.
ज्या दिवशी हे दर कमी
होतील त्या दिवशी लोक आनंदाने चित्रपट बघायला येतील आणि कोटींची कमाई करण्यासाठी निरनिराळ्या क्लृप्त्या लढवत बसण्याचीही वेळ येणार नाही. 
 
हजारो प्रिंट्समध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट
च्या वर्षी साडेचार हजार प्रिंट्समध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये नुकत्याच प्रदर्शित झालेल्या शाहरूखच्या ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटाचे नाव घेता येईल. त्यापाठोपाठ हृतीकचा ‘बँग बँग’ आणि सलमानचा ‘किक’ चित्रपटही अशा प्रकारे प्रदर्शित झाला होता.