Join us

रिअ‍ॅलिटी शोने स्पर्धकांना चांगला प्लॅटफॉर्म दिला

By admin | Published: January 29, 2017 11:55 PM

शंकर महादेवन यांनी आतापर्यंत एकापेक्षा एक सरस गाणी गायली आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांना संगीतदेखील दिले आहे. आता ते एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत

प्राजक्ता चिटनीस

शंकर महादेवन यांनी आतापर्यंत एकापेक्षा एक सरस गाणी गायली आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांना संगीतदेखील दिले आहे. आता ते एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ते ‘रायझिंग स्टार’ या कार्यक्रमात परीक्षकांची भूमिका साकारणार आहे. या निमित्ताने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा...

अनेक ‘सींगिंग रिअ‍ॅलिटी शो’ सध्या छोट्या पडद्यावर येत आहेत, त्यात ‘रायझिंग स्टार’ या कार्यक्रमाचे काय वेगळेपण आहे?कोणत्याही ‘रिअ‍ॅलिटी शो’ मध्ये स्पर्धकांसाठी व्होट करण्यासाठी प्रेक्षकांना काही दिवस मिळतात; पण या शोमध्ये कार्यक्रम सुरू असतानाच प्रेक्षकांना व्होट करायचे आहे, हे वेगळेपण आहे.

गायक असताना परीक्षकाची भूमिका साकारणे सोपे आहे की कठीण आहे?परीक्षण करणे कठीण असते असे मला वाटते आणि आपल्या देशात खूप चांगले टॅलेंट आहे. त्यामुळे परीक्षण करताना कोणाची निवड करू आणि कोणाची नाही, असा दहावेळा विचार करावा लागतो.

‘रिअ‍ॅलिटी शो’चा फायदा होतो असे तुला वाटते का?‘रिअ‍ॅलिटी शो’मुळे लोकांना प्लॅटफॉर्म मिळाला आहे. त्यांना आपली कला लोकांसमोर सादर करता आली आहे. त्यामुळे त्यांना भविष्यात गायनाच्या क्षेत्रात संधीदेखील मिळत आहेत. आज बॉलिवूडमध्ये कमीत कमी २० तरी गायक हे ‘रिअ‍ॅलिटी शो’च्या माध्यमातून आले आहेत. त्यामुळे ‘रिअ‍ॅलिटी शो’चा लोकांना नक्कीच फायदा होतो.

सध्या सगळ्या ‘रिअ‍ॅलिटी शो’मध्ये तीन किंवा त्याहून अधिक परीक्षक असतात. दिलजीत, मोनाली ठाकूर आणि तू या कार्यक्रमाचे परीक्षण करणार आहात. त्यामुळे स्पर्धकांच्या निवडीवरून काही वाद झालेत, तर तुम्ही ते कशाप्रकारे मिटवणार आहात?प्रत्येक व्यक्तीचे मत हे वेगवेगळे असते. मला एखादी गोष्ट आवडेल, ती दुसऱ्याला आवडेलच असे नाही. तसेच स्पर्धकांच्या बाबतीतदेखील सगळ्या परीक्षकांचे एक मत असणे कठीण आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात सगळ्या परीक्षकांचे एक मत होतच नाही. आमच्यात एक मत होत नसल्यास मी, दलजीत आणि मोना चर्चा करून त्याच्यातून मार्ग काढणार आहोत.