Join us

Shocking! अर्जुन रामपालचा संसार अडचणीत, पत्नीपासून राहतो वेगळा?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2018 12:27 PM

एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, अर्जुन रामपालने घर सोडलं असून तो पत्नी आणि मुलांपासून वेगळा राहतो आहे. 

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या घटस्फोटाच्या एकापाठी एक घटना घडत आहेत. अनेक मोठ्या स्टार्सनी आपला अनेक वर्षांचा संसार संपवला आहे. मलायका-अरबाझ यांच्यानंतर आता अभिनेता अर्जुन रामपाल हा पत्नी मेहर जेसिकापासून वेगळा झाल्याची चर्चा होत आहे. एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, अर्जुन रामपालने घर सोडलं असून तो पत्नी आणि मुलांपासून वेगळा राहतो आहे. 

'स्पॉटब्वॉय' ने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही महिन्यांपासून अर्जुन रामपाल आणि हृतिक रोशनची एक्स वाईफ सुझेन खान यांच्या अफेअरच्या बी-टाऊनमध्ये रंगल्या आहेत. दोघांमध्ये वाढत असलेल्या जवळीकीमुळेच अर्जुनने पत्नीपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. 

गेल्यावर्षी एका पार्टीमध्ये मेहर जेसिका आणि सुझेन खान यांच्यातील भांडणही चर्चेत आलं होतं. आता अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी जेसिकामध्ये बरेच प्रॉब्लेम सुरु असल्याचं बोललं जात आहे. आता अर्जुनच्या 18 वर्षांच्या संसारात मिठाचा खडा पडल्याची चर्चा आहे. 

टॅग्स :अर्जुन रामपालबॉलिवूड