Join us

REALLY! 'तारक मेहता'मधील भिडे मास्तरांचं खरं नाव शेजाऱ्यांनाही नाही माहित, आहे कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 3:05 PM

Mandar Chandwadkar Birthday : तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतल्या भिडे मास्तर म्हणजेच मंदार चांदवाडकरचा आज वाढदिवस आहे. मंदार भिडे गुरुजी म्हणून इतके लोकप्रिय आहे की त्याला त्याच नावाने शेजारचे ओळखतात आणि विजेचे बिलदेखील त्याच नावाने येते.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत आत्माराम भिडेची भूमिका मंदार चंदावरकर(Mandar Chandavarkar)ने साकारली आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतले भिडे मास्तर खूप लोकप्रिय आहेत. मंदार चांदवाडकर गेले १३ वर्ष ही भूमिका साकारत आहेत. आत्माराम भिडे हे नाव इतकं लोकप्रिय झालंय की त्यांचं खरं नावही शेजाऱ्यांना माहीत नाही. असं म्हणतात, विजेचं बिलही त्याच नावाने येते. 

अभिनेता मंदार चांदवडकर आधी दुबईमध्ये मेकॅनिकल इंजिनियर म्हणून काम करत होते. २००० मध्ये त्याने नोकरीला रामराम केला. त्यानंतर नाटक आणि मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. आठ वर्ष मराठी नाटकांमध्ये काम केल्यानंतर आत्माराम भिडे ही व्यक्तिरेखा साकारायला सुरुवात केली. भिडे हे पात्र घराघरात पोहचलं की मंदार यांचे शेजारीही त्यांना खऱ्या नावाने ओळखत नाहीत. त्यांचे शेजारी देखील त्याला भिडे नावानेच हाक मारतात.

भिडे हे पात्र आता मंदारची ओळखच बनून गेले आहे. लोकांनी भिडेचे पात्र इतके गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली की त्याच्या घराचे वीज बिलदेखील मास्टर भिडे या नावाने येते. कोणीच त्यांचा पत्ता खर्‍या नावाने सांगू शकत नाही. लोक त्याला सतत गोकुळधाम सोसायटीबद्दल विचारत असतात. मंदार यांच्याकडे जवळपास २० कोटींची मालमत्ता आहे. ते या मालिकेतील एका एपिसोडसाठी साधारणपणे ४५ हजार रुपये मानधन घेतात. त्याला महागड्या गाड्यांची आवड आहे. 

टॅग्स :मंदार चांदवडकरतारक मेहता का उल्‍टा चश्‍मा