सेलिब्रिटी मंडळी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. मग ते स्वतःविषयीचं एखादं कारण असो. अभिनेत्री जुही चावला सामाजिक कार्यक्रमांमध्ये फारच सक्रिय असते. विविध मुद्द्यांवर लोकांना जागरुक करण्याचेही कार्य ती करत असते. फार कमी लोकांना माहीत आहे की जूही गेल्या काही वर्षापासून ऑरगॅनिक प्रोडक्टसला प्रोत्साहन देत आहे आणि त्यासाठी ती शेतीही करते. जूही सांगते, आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’मधील एक एपिसोड पाहिल्यानंतर माझे डोळे उघडले आणि त्यानंतर मी ऑर्गॅनिक शेती करण्याचा निर्णय घेतला. वाडा (महाराष्ट्र) स्थित फार्महाउस येथे जूही शेतीचे काम करते. जी गोष्ट करण्यास तिला आमिर खानने प्रेरित केले त्याच जुही चावलाने आमिरसोबत एकेकाळी काम करण्यास नकार दिला होता. आमिर खानने आपल्या कारकीर्दीत बर्याच अभिनेत्रींबरोबर काम केले. त्यापैकी काही हिट झाल्या तर काही सुपर हिट तर काही फ्लॉप ठरल्या. सुपरहिट ठरलेल्यांच्या यादीत जुही चावलाचीही गनणा होते.
रूपेरी पडद्यावर जूही आणि आमिर खानची जोडी चांगलीच पसंतीला उतरली होती. दोघांनी मिळून अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. पण एक वेळ अशी आली होती की जुहीने आमिर खानबरोबर काम करण्यास नकार द्यायला सुरुवात केली होती. 'इश्क' सिनेमाच्यावेळी आमीरने जूहीबरोबर घाणेरडा जोक केला होता. आमीरने जुहीला सांगितले की त्याला हात बघून भविष्य कळते. त्यामुळे तिनेही भविष्य जाणून घेण्यासाठी आपला हात पुढे केला. हात दाखवताच आमिर खान तिच्या हातावर थुंकला. या घाणेरडा प्रकार जुहीला अजिबात आवडला नाही. त्याच्यावर खूप संतापली. सिनेमाचे शूटिंगही पूर्ण न करता अर्धवट सोडण्याच्या तयारीत जुही होती. जुहीची समजूत काढल्यानंतर कसेबसे शूटिंग पूर्ण झाले.
या सिनेमानंतर तिने कधीच आमिरसह काम करणार नसल्याचा निर्धारच केला. जूहीला आमिर खानसह 'राजा हिंदुस्थानी' सिनेमाची ऑफरही मिळाली होती पण तिने आमिरचे कारण देत सिनेमात काम करण्यास नकार दिला. जूहीला ऑफर झालेली भूमिका पुढे करिश्मा कपूरला मिळाली.
‘दिल’ या सिनेमाच्या सेटवर माधुरी दीक्षितसोबतही आमिरने असेच केले होते. या सिनेमातील ‘खंबे जैसी खडी है’ या गाण्याचं शूटिंग सुरू असताना आमिरने माधुरीला पटवले. मला हात बघता येतो, भविष्य कळत, असे काय काय तिला सांगितले. माधुरी त्याच्या थापांना भुलली. तिने हात समोर करताच आमिर तिच्या हातावरही पचकन थुंकला. ते पाहून माधुरी इतकी खवळली होती की, हॉकी स्टिक घेऊन त्याला मारायला धावली होती.