Join us

'राम तेरी गंगा मैली' सिनेमासाठी मंदाकिनी नाही तर ही मराठमोळी अभिनेत्री होती पहिली पसंती, या कारणामुळे दिला होता नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 14:56 IST

कारकिर्द ऐन भरात असताना त्यांना 'राम तेरी गंगा मैली', 'एक दूजे के लिए', 'सिलसिला' अशा सिनेमांच्या ऑफर्सही आल्या होत्या. मात्र तारखा नसल्याने त्यांनी या सिनेमात काम करण्यास नकार दिला.

पद्मिनी कोल्हापूरे... हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावणारी मराठमोळी अभिनेत्री. प्रेम रोग, आहिस्ता आहिस्ता, वो सात दिन, विधाता अशा विविध सिनेमातील भूमिकांनी पद्मिनी कोल्हापूरे यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. त्यांच्या चेह-यावरील निरागसपणा, आकर्षक आणि घायाळ करणारं सौंदर्य यामुळे 80च्या दशकात पद्मिनी कोल्हापूरे यांची वेगळीच जादू होती. मात्र पद्मिनी कोल्हारपूरे या अभिनयाच्या क्षेत्रात अपघातानेच आल्या. आपल्या आत्या लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्याप्रमाणे गायिका बनण्याचं त्यांचं स्वप्न होतं. फक्त नशीब आजमावण्यासाठी त्या सिनेमात आल्या होत्या. मात्र नंतरच्या काळात सिनेमा आणि अभिनयच त्यांचं जणू आयुष्य बनलं. 

'इश्क इश्क इश्क’ आणि ‘सत्यम शिवम सुंदरम या सिनेमात त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय केला. वयाच्या 15व्या वर्षी इंसाफ का तराजू या सिनेमासाठी त्यांना पुरस्कारही मिळाला होता. यानंतर पद्मिनी कोल्हापूरे अभिनय आणि सिनेमात रमल्या. विविध सिनेमात त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या. कारकिर्द ऐन भरात असताना त्यांना 'राम तेरी गंगा मैली', 'एक दूजे के लिए', 'सिलसिला' अशा सिनेमांच्या ऑफर्सही आल्या होत्या. मात्र तारखा नसल्याने त्यांनी या सिनेमात काम करण्यास नकार दिला. एका टीव्ही शो दरम्यान पद्मिनी कोल्हापूरे यांनी याबाबत खुलासा केला होता. 

या सुपरडुपर ठरलेल्या सिनेमांना नकार दिल्याचा पश्चात होत असल्याची कबुलीही त्यांनी दिली होती. जर वेळ मागे नेणं शक्य झालं असतं तर त्यावेळी नकार दिलेल्या सिनेमात काम केलं असतं असंही त्यांनी म्हटलं. विशेष म्हणजे पद्मिनी कोल्हापुरे यांनी नकार दिलेले सगळे सिनेमात हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरहिट ठरले आहेत.  

टॅग्स :मंदाकिनीपद्मिनी कोल्हापुरे