शॉर्ट स्कर्टमध्ये कसे बसावे ? Rakul Preet Singh ला चाहत्यांनीच दिल्या टीप्स
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 06:35 PM2021-12-04T18:35:56+5:302021-12-04T18:56:28+5:30
तेलुगू आणि पंजाबी चित्रपटांपासून बॉलिवूडपर्यंत मजल मारणारी अभिनेत्री रकुल प्रीत सिंग अनेकदा तिच्या ग्लॅमरस स्टायलिश लूकने चाहत्यांची पसंत मिळवत असते.
एखादा इव्हेंट, सोहळ्याला हजेरी लावताना सेलिब्रिटी मंडळी संपूर्ण तयारीत हजेरी लावतात. या प्रसंगी आपण ग्लॅमरस, हँडसम कसे दिसू आणि उपस्थितांच्या नजरांसह कॅमे-याच्या नजरा आपल्याकडे कशा राहतील याची सेलिब्रिटी मंडळी विशेष काळजी घेतात. त्यामुळे महागडे डिझायनर ड्रेसेस किंवा स्टायलिश लूकमध्ये सेलिब्रिटी या कार्यक्रमांना हजेरी लावतात. मात्र कधी कधी याच स्टाईल आणि फॅशनमुळे सेलिब्रिटींवर अवघडल्यासारखी परिस्थिती येते. अनेकदा ट्रायल घेऊनदेखील ड्रेसमध्ये काही कमतरता राहून जाते.असंच काहीसं घडलं आहे रकुल प्रीत सिंहसोबत.
तेलुगू आणि पंजाबी चित्रपटांपासून बॉलिवूडपर्यंत मजल मारणारी अभिनेत्री रकुल प्रीत सिंग अनेकदा तिच्या ग्लॅमरस स्टायलिश लूकने चाहत्यांची पसंत मिळवत असते. आपल्या हटके लूकने अनेकवेळा इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसते. असं असलं तरी रकूलला अनेकवेळा oops मोमेंट्सचा सामना करावा लागला आहे.आता पुन्हा तिला याच कारणामुळे ट्रोल केले जात आहे. कारण पुन्हा ती oops मोमेंट्सची बळी ठरली आहे.
तिचा आगामी 'दे दे प्यार दे' के प्रमोशन दरम्यान पिंक कलर शॉर्टस्कर्टमध्ये तिने हजेरी लावली होती. यावेळी खुर्चीवर बसताच तिच्या स्कर्टमुळे खुल्या पायांचे प्रदर्शन होत होते. हा स्कर्ट इतका शॉर्ट होता की, तिला बसणेही कदाचित अवघड जात असावे. मात्र याच स्कर्टने तिची चांगलीच फजिती केल्याचे पाहायला मिळाले.
हा फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी तिच्या ड्रेसमुळे तिच्यावर टीका करत असल्याचे पाहायला मिळत आहे. रकूलला अंदाजही नसावा की तिचा हा स्कर्टच तिला नेटीझन्सच्या टीकेसाठी कारणीभूत ठरेल. शॉर्ट स्कर्टमध्ये कसे बसावे याच्या टीप्ससुद्धा तिचे चाहते देत असल्याचे पाहायला मिळत आहे.