मराठी चित्रपटसृष्टीत ९०च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर. 'गंमत जंमत', 'हमाल दे धमाल', 'लपंडाव', 'भुताचा भाऊ' यासारखे मराठी चित्रपटात वर्षा उसगांवकर यांनी साकारलेल्या भूमिका रसिकांना भावल्या. इतकंच नाहीतर मराठीतील या यशामुळे वर्षा उसगांवकर यांच्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीची दारं उघडली. 'परवाने', 'तिरंगा', 'हस्ती', 'दूध का कर्ज', 'घर आया मेरा परदेसी' अशा विविध सिनेमात वर्षा उसगांवकर यांनी भूमिका साकारल्या आहेत.
अभिनयासह त्यांच्या सौंदर्याने रसिकांना भुरळ घातली. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही त्या आधीप्रमाणेच सुंदर आणि चिरतरुण दिसतात. चित्रपटात त्यांचं दर्शन होत नसलं तरी मराठी तारकासारख्या कार्यक्रमात त्या आपल्या नृत्याची आवड जोपासताना दिसतात. तर 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतून रसिकांचे मनोरंजन करत आहेत.
वर्षा उसगांवकर यांचे फिल्मी करिअल सोडले तर खासगी आयुष्याबद्दल फारसे चाहत्यांना माहिती नाही. वर्षा यांना दोन बहिणी आहेत. तोषा आणि मनिषा. दोन्ही बहिणी दिसायला वर्षा यांच्याप्रमाणेच फारच सुंदर आहेत. मात्र या दोघींनीही सिनेक्षेत्र नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. तोषा कुराडे या या डॉक्टर आहे.
गोव्यामध्ये डॉ. तोषाज लॅबोरेटरी आणि मेडिकल सेंटर चालवतात.दुसरी बहिण मनिषा तारकर उद्योजिका आहेत.गोव्यामध्येत माईनस्केप मिनरल्स, तारकर ब्रदर्स कंपनीचा कारभार त्या सांभळतात.सौदर्याच्या बाबतीत तोषा आणि मनिषा वर्षा यांच्याप्रमाणेच देखण्या आहेत पण दोघींनीही करिअरसाठी वेगवेगळे क्षेत्र निवडले. आज तिन्ही बहिण त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी आहेत.
वर्षा उसगांवकर यांनी अजय शर्मा यांच्या लग्न करत संसार थाटला. अजय शर्मा यांचे संपूर्ण कुटुंब संगीत क्षेत्राशी संबंधित आहे. तर वर्षा यांचे वडील हे प्रसिद्ध राजकारणी होते. सिनेइंडस्ट्रीत ८० -९० चा काळ आपल्या सुंदर मनमोहक अदाकारीने गाजवणा-या एव्हरग्रीन अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांची जादू आजही कायम आहे.