Join us

म्हणून फ्लॉप होतात बिग बजेट चित्रपट!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2019 12:17 PM

गेल्या काही वर्षापासून बॉलिवूडमध्ये बिग बजेट चित्रपट खूप वाईट पद्धतीने फ्लॉप होताना दिसत आहेत. मोठमोठे चित्रपट फ्लॉप झाल्याने सुपरस्टार्सचे स्टारडम धोक्यात आले आहे. गेल्यावर्षी शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान आणि अमिताभ बच्चन या दिग्गज स्टार्सच्या बिग बजेट चित्रपटांनी प्रेक्षकांची घोर निराशा केली. नेमके बिग बजेट चित्रपट का फ्लॉप होतायत, त्याबाबत घेण्यात आलेला हा आढावा...

-रवींद्र मोरे

गेल्या काही वर्षापासून बॉलिवूडमध्ये बिग बजेट चित्रपट खूप वाईट पद्धतीने फ्लॉप होताना दिसत आहेत. एकीकडे पाण्यासारखा पैसा खर्च करुन चित्रपट बनवून दिग्दर्शक प्रेक्षकांना थिएटरकडे वळविण्यात अपयशी ठरले तर दुसरीकडे कमी बजेटचे चित्रपट सुपरहिट ठरले. मोठमोठे चित्रपट फ्लॉप झाल्याने सुपरस्टार्सचे स्टारडम धोक्यात आले आहे. गेल्यावर्षी शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान आणि अमिताभ बच्चन या दिग्गज स्टार्सच्या बिग बजेट चित्रपटांनी प्रेक्षकांची घोर निराशा केली. नेमके बिग बजेट चित्रपट का फ्लॉप होतायत, त्याबाबत घेण्यात आलेला हा आढावा...

* सृजनशिलतेचा अभाव

कथानकात नवेपण प्रेक्षकांनी पहिली मागणी असते. अशातच त्यांच्यासमोर कॉपी करण्यात आलेले सीन पुन्हा दर्शविले तर प्रेक्षकांना ते स्वीकारणे कठीण होते. एवढेच नव्हे तर बिग बजेट चित्रपटांचे पोस्टरदेखील कॉपी केलेले असतात, शिवाय यात डायलॉगपासून ते अ‍ॅक्शन सीनपर्यंत सर्वकाही चोरलेले असते.

* स्टार्सची मनमानी

काही चित्रपटांपैकी एक-दोन असेही आहेत ज्यात सुपरस्टार्सना ओव्हर अ‍ॅक्टिंग करताना पाहण्यात आले आहे. असे कथानकाच्या मागणीनुसार नसते, मात्र अभिनेत्याच्या स्टारडमच्या पुढे दिग्दर्शकाला झुकावे लागते. स्टार्सची आपली मनमानीदेखील चित्रपट फ्लॉप होण्याचे मोठे कारण मानले जाते.

* कथानक कमकुवत होणे

बऱ्याचदा बिग बजेट चित्रपटात निर्मात्यांची पहिली पसंती सुपरस्टार्सना असते. जर चित्रपट मल्टीस्टारर असेल तर सर्वांचा स्क्रीन टाइम खूपच विचारपूर्वक ठरविला जातो, मात्र या स्टार्सच्या कारणाने लहान पात्र आणि त्यांच्या भूमिकेचे महत्त्व लपले जाते. अशातच चित्रपट लीड स्टार्सवर केंद्रित होण्याच्या कारणाने कथानक कमकुवत होते.

* दिग्दर्शनात उणिवा

चित्रपट जेवढा बिग बजेट असतो, त्यात तेवढ्याच प्रमाणात सुक्ष्म काम करण्याचे प्रयत्न असावेत, मात्र बऱ्याचदा बिग बजेट चित्रपटांचे दिग्दर्शक चित्रपटाच्या दृष्यांच्या सुक्ष्मतेवर लक्ष द्यायला विसरतात, जी कमजोर दिग्दर्शकाची ओळख मानली जाते. या गोष्टीचा अनुभव ‘फिल्म ठग्स आॅफ हिंदोस्तान’ मधील इंग्रजांची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांच्या हिंदीमधील डायलॉगमधून आला.

* कथानकाशिवाय भव्य सेटची उभारणी

बाहुबली चित्रपटानंतर बऱ्याच चित्रपटांमध्ये भव्य सेट लावण्याची जणू क्रेझच निर्माण झाली होती, मात्र कथानकानुसार ही सजावट खूपच अवाढव्य ठरली. अशातच दिग्दर्शकांना भव्य सेटसोबतच कथानकावरदेखील काम करणे आवश्यक होते, ज्यात त्यांनी मोठी चुक केली.

टॅग्स :बॉलिवूडठग्स आॅफ हिंदोस्तानशाहरुख खानअमिताभ बच्चनआमिर खानसलमान खान