Join us

भूतकाळातील ‘त्या’ गोष्टींबाबत रिना रॉयला आजही आहे पश्चाताप, त्यामुळे बरबाद झाले आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 13:26 IST

80 च्या दशकातली अभिनेत्री रिना रॉय पाकिस्तानी क्रिकेटरवर लट्टू झाली होती. रिना यांनी पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानसह लग्न करत भारत सोडून पाकिस्तानात स्थायिक झाल्या.

क्रिकेट आणि बॉलीवुड या दोन्हींबाबत भारतीयांमध्ये प्रचंड जिव्हाळा आहे. क्रिकेटर्स आणि बॉलीवुड कलाकारांवर रसिक जीवापाड प्रेम करतात. क्रिकेट आणि बॉलीवुड अगदी सुरुवातीच्या काळापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे एकमेकांशी जोडले गेलेले आहे. क्रिकेटच्या मैदानात मॅच पाहण्यासाठी बॉलीवुड कलाकार आवर्जून हजर असतात. तर बॉलीवुडच्या पार्ट्यांमध्ये क्रिकेटर्स सामील होतात.

 क्रिकेट आणि बॉलीवुडचं नातं एवढ्यापुरतं मर्यादित नाही. गेल्या अनेक वर्षांत क्रिकेटर्स आणि बॉलीवुड कलाकारांमध्ये प्रेमाचं नातंही जुळलं आहे. क्रिकेटर्सवर अनेक बॉलीवुडच्या अभिनेत्री फिदा झाल्याची उदाहरणं आहेत. क्रिकेटर्स आणि बॉलीवुडच्या अभिनेत्रींच्या अफेअर्सच्या चर्चा कायम रंगत असतात.

बॉलीवुड अभिनेत्री-क्रिकेटर्स अफेअर्स हे काही नवीन नाही. अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटर्ससह लग्नगाठ बांधत आपल्या आयुष्याची सुरूवात केली आहे. मात्र एका अभिनेत्रीला क्रिकेटरसह लग्न करणे इतके महागात पडले की आजही त्या गोष्टीची सजा ती भोगत आहे.  80 च्या दशकातली  अभिनेत्री रिना रॉय पाकिस्तानी क्रिकेटरवर लट्टू झाली होती. रिना यांनी पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानसह लग्न करत भारत सोडून पाकिस्तानात स्थायिक झाल्या. काही काळानंतर त्यांनी घेतलेल्या निर्णयावर मोठा पश्ताताप झाला आणि सगळेकाही सोडून त्या पुन्हा भारतात परल्या.

विशेष म्हणजे ८० च्या दशकामध्ये रीना रॉयला बॉलीवूडमधील टॉप अभिनेत्री मानले जात होते पण लग्न केल्यानंतर त्यांनी सर्व काही सोडले आणि हीच त्यांचीसर्वात मोठी चूक ठरली.

टॅग्स :रीना रॉय