Join us

‘रेगे’ची कोटीची ङोप!

By admin | Published: August 22, 2014 11:13 PM

स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘रेगे’ या चित्रपटाने एक कोटीची ङोप घेतली आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत एक कोटीच्या वर कमाई केली आहे.

राज चिंचणकर - मुंबई
स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘रेगे’ या चित्रपटाने एक कोटीची ङोप घेतली आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत एक कोटीच्या वर कमाई केली आहे. ‘लय भारी’ आणि ‘पोश्टर बॉंईज’ या चित्रपटांची सुरू असलेली यशस्वी घोडदौड ‘रेगे’नेही कायम ठेवली आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत, असे म्हणणो वावगे ठरणार नाही.
शुक्रवारी प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट रविवार्पयत चालला तरी चित्रपट निर्माते व त्या चित्रपटाशी संबंधित मंडळी भरून पावले असा सुटकेचा नि:श्वास टाकत होती; परंतु अलीकडे या चित्रत आमूलाग्र बदल झाला असून, चित्रपटाची मजल चक्क काही आठवडय़ांर्पयत जाऊ लागली आहे. मराठी चित्रपट कधीकाळी तिकिटांच्या गल्ल्यावर कोटींचा पल्ला पार करेल, ही अशक्य वाटणारी घटना आता मूर्त स्वरूपात आली आहे. मराठी चित्रपटांतली विषयाची आशयघनता आणि त्यांच्या बदललेल्या भव्यदिव्य अशा स्वरूपामुळे मराठी चित्रपट आता कोटीच्या घरात नांदायला लागला असून, हे चित्रपट रसिकांनाही सिनेमागृहांकडे वळवण्यात यशस्वी होत आहेत. बालक पालक, दुनियादारी आणि टाइमपास या मराठी चित्रपटांनी कोटीची कमाई करत संबंधितांचे कोटीकल्याण केले. वेगळे विषय, नव्या पद्धतीची मांडणी ही या बदलाला कारणीभूत होतीच. 
हिंदी चित्रपटांमध्ये बस्तान बसवलेल्या रितेश देशमुखने अलीकडेच मराठी चित्रपटात लय भारी पदार्पण केले आणि त्याने गल्ल्यावर तब्बल 35 कोटींहून अधिक अशी विक्रमी ङोप घेत मराठी चित्रपटाला नवा आयाम प्राप्त करून दिला. त्याच्यापाठोपाठच एक आगळीवेगळी कल्पना घेऊन श्रेयस तळपदे मराठी पडद्यावर अवतरला आणि ‘पोश्टर बॉंईज’च्या माध्यमातून त्याने नवी इनिंग खेळली. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने गर्दी खेचली. ऑगस्टच्या पहिल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 4 कोटींचा आकडा गाठला आहे. 
‘लय भारी’ आणि ‘पोश्टर बॉंईज’ या चित्रपटांची धामधूम सुरू असतानाच 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर रेगे या चित्रपटाने पडद्यावर वर्दी दिली आणि पहिल्या तिन दिवसांतच त्याने एक कोटीचा व्यवसाय करून दाखवला. मराठी चित्रपटांच्या या यशामागे त्यांचा बदललेला चेहरामोहरा तर आहेच आणि त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रीय पुरस्कारांवर उमटवलेली मोहोरही अनेकांना मराठी चित्रपटसृष्टीकडे लक्ष वेधून घेण्यास भाग पाडत आहे.