सौंदर्याची राणी, दिलखेचक अदांनी घायाळ करणारी, तरूण अभिनेत्रींना लाजवेल असा उत्साह आणि दिवसागणिक चिरतरूण होणाऱ्या अभिनेत्री म्हणजे बॉलीवूड दिवा रेखा. सौंदर्य, अभिनय आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी मजल मारली. रेखा यांनी आजवर १८० पेक्षा जास्त सिनेमात काम केले आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिकेत त्यांनी आपलं वेगळेपण सिद्ध् केले आहे. त्यांना त्यांच्या सिने कारकीर्दीत खूप स्ट्रगल करावा लागला होता. रेखा यांच्यासारख्या यशस्वी नायिकांमध्ये फार कमी नायिका असतील ज्यांनी बोल्ड भूमिका साकारल्या असतील. कामसूत्र चित्रपटात बोल्ड सीन खूप होते. या चित्रपटाला त्यावेळी बॉक्स ऑफिसवर खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता आणि या सिनेमाची प्रशंसाही झाली होती. हा चित्रपट बऱ्याच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवला गेला. चित्रपटात रेखा यांनी कामसूत्र शिकवणाऱ्या शिक्षिकेची भूमिका केली होती.
एकेकाळी बोल्ड सीन्समुळे चर्चेत राहिल्या होत्या रेखा, त्यांचे हे चित्रपट पाहण्याआधी 10 वेळा करा विचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 06:00 IST