Join us

रेखा यांच्या सौंदर्य आणि खळखळत्या उत्साहाने 'गुम है किसी के प्यार में'च्या नव्या प्रोमोला लावले चारचाँद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 19:38 IST

अभिनेत्री रेखा यांची झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.

हिंदी चित्रपटसृष्टीच्या अभिनेत्री आणि बॉलिवूड दिवा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशा अभिनेत्री म्हणजे रेखा. बॉलिवूड दिवा आणि अनेकांच्या दिलों की धडकन अशी त्यांची ओळख. त्यांच्यासह काम करण्यासाठी अनेक कलाकार एका पायावर तयार असतात. तसेच त्यांचे चाहते त्यांची झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात. 

'गुम है किसी के प्यार में' आजपर्यंतचा सर्वात लोकप्रिय टेलीविजन शो राहिला आहे आणि जेव्हा अभिनेत्री रेखा यांनी या मालिकेसाठी आपला पहिला प्रोमो शूट केला, तेव्हापासून तर या शोबाबतची उत्सुकता अनेकपटींनी वाढली आहे. यानंतर तर, चाहते रेखा यांना टेलीविजन स्क्रीनवर पुन्हा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. संयोगाने, मालिकेच्या निर्मात्यांनी आपल्या चाहत्यांना नवीन प्रोमोने सरप्राइज देण्याचा निर्णय घेतला. मात्र, यासाठी अभुतपूर्व सौंदर्यवती रेखा यांच्याशिवाय दुसरे कोण असू शकते, जो आपल्या उत्कट भावनांचे तितकेच योग्य चित्रण करून या दिलखेचक प्रोमोला न्याय देऊ शकले असते?

हा प्रोमो मंत्रमुग्ध करणारा असून रेखा यांच्या मधुर आवाजात साई और विराट यांच्या जीवनाची कहाणी ऐकल्यानंतर, आपण हे पाहण्यासाठी उत्सुक होतो की पुढे काय होणार आहे? काय साई आणि विराट यांना आपल्या प्रेमाची जाणीव होईल की  या मालिकेतील नवा ट्विस्ट त्यांना दूर करेल? पाहात रहा, 'गुम है किसी प्यार में' फक्त स्टार प्लस वाहिनीवर. 

टॅग्स :रेखास्टार प्लस