Join us

आधी काम मग आराम

By admin | Published: September 09, 2016 2:09 AM

गायिका नेहा राजपाल ही निर्माती बनण्यास सज्ज झाली आहे. लवकरच तिचा ‘फोटोकॉपी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

गायिका नेहा राजपाल ही निर्माती बनण्यास सज्ज झाली आहे. लवकरच तिचा ‘फोटोकॉपी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नेहाचा हा पहिलाच चित्रपट असल्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची एकही संधी ती वाया घालवत नाहीये. नेहाची काही दिवसांपूर्वी तब्येत बिघडली होती आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिने गणपतीचे दर्शन घेतानाचा एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या फोटोमध्ये तिच्या हाताला आपल्याला बँडेज असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. या फोटोविषयी ‘लोकमत सीएनएक्स’शी बोलताना नेहा सांगते, ‘‘फोटोकॉपी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेली कित्येक दिवस माझा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. यामुळे माझी खूप दगदग झाली आहे. या प्रवासामुळे मला किडनी इन्फेक्शन झाले होते. त्यामुळे गणपतीच्या दोन दिवस आधी मला हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करावे लागले. पण गेल्या दहा वर्षांपासून गणपती बसवण्याची आमची परंपरा आहे. या परंपरेला छेद दिला जाऊ नये यासाठी मी डॉक्टरांच्या परवानगीने डिचार्ज घेतला आणि घरातूनच उपचार सुरू ठेवले. त्यामुळे मला गणपतीच्या प्रतिष्ठापनेमध्ये सहभागी होता आले. पण या वेळी गणपतीची पूजा आम्ही थोडक्यात केली. आता माझी तब्येत हळूहळू पूर्ववत होत आहे. माझ्या आईने आणि माझ्या नवऱ्याने या वेळात माझी खूप काळजी घेतली. तब्येत पूर्णपणे बरी झाल्यानंतर मी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये पुन्हा सहभागी होणार आहे. आधी काम मग आराम हाच विचार मनात ठेवून चित्रपटाच्या प्रमोशनवर भर देणार आहे.