संघर्षयात्रा हा भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे, हे आता सर्वश्रृत आहेच. मुंडे यांच्या जन्मदिनी म्हणजे ११ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, प्रेक्षकांसह कार्यकर्त्यांनाही चित्रपटाच्या प्रदर्शनाचे वेध लागले होते. मात्र, मुंडे यांची कन्या आणि राज्याच्या महिला व बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी काही प्रसंगांना ‘कात्री’ लावण्याची सूचना केल्यामुळे दिग्दर्शक साकार राऊत यांना हे प्रसंग वगळावे लागले. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख काहीशी पुढे ढकलण्यात आली. मात्र, हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार? हे अद्यापही जाहीर करण्यात आलेले नाही. सिद्धिविनायक मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात शरद केळकर गोपीनाथ मुंडे यांच्या भूमिकेमध्ये दिसणार असून, पंकजा मुंडे यांचा रोल श्रृती मराठे करीत आहे, तर ओंकार कर्वे (प्रमोद महाजन), दीप्ती भागवत (प्रज्ञा मुंडे), गिरीश परदेशी (प्रवीण महाजन) यांच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. पाहू या आता चित्रपटाच्या प्रदर्शनाला कधी मुहूर्त मिळतोय ते!
‘संघर्षयात्रा’ची रीलिज डेट अद्याप गुलदस्त्यात
By admin | Published: January 03, 2016 4:24 AM