मुंबई - करण जोहरच्या दिग्दर्शित कुछ कुछ होता है हा १९९८ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट बॉलिवूडच्या इहिहासातील एक माईलस्टोन ठरला होता. या चित्रपटामध्ये शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांनी प्रमुख भूमिका निभावली होती. आता करण जोहर या चित्रपटाचा रिमेक बनवण्याच्या विचारात आहे. हल्लीच एका मुलाखतीमध्ये करण जोहरला कुछ कुछ होता है चा रिमेक बनवल्यास त्याची स्टार कास्ट काय असेल? असं विचारण्यात आलं. तेव्हा करण जोहर म्हणाला की, रणवीर सिंह, आलिया भट्ट आणि जान्हवी कपूर, ही माझी ड्रीम कास्ट असेल. मात्र सध्यातरी अशी कुठलीही योजना नाही आहे.
करण जोहर म्हणाला की, रणवीर सिंहला शाहरुख खानच्या भूमिकेत, आलिया भट्टला काजोलच्या आणि जान्हवी कपूरला राणी मुखर्जीच्या भूमिकेत पाहू इच्छितो. जान्हवी कपूर ती भूमिका उत्तमपणे बजावेल. कारण ती एक कॉलेजमधील तरुणी आणि हॉट मुलीची भूमिका योग्य प्रकारे बजावू शकते.
त्याबरोबरच मुलं मोठी झाल्यावर त्यांच्यासाठी कशाप्रकारचा चित्रपट तयार करण्याची इच्छा आहे, असे विचारले असता करण जोहरने सांगितले की, आजचा काळ पाहता मला वाटते की, मुले खूप इवॉल्व्ह झाली आहेत. तसेच मी केवळ त्यांच्यासाठी चित्रपट तयार करणार नाही. मी एक हॅप्पी चित्रपट तयार करू इच्छितो. कारण मुलांना केवळ आनंद दिला पाहिजे.
सध्या करण जोहर त्याच्या कॉफी विथ करण शोमध्ये परत आला आहे. तीन वर्षांनंतर हा शो परत आला आहे. या शोमध्ये वेगवेगळे पाहुणे येत आहेत.