Join us

नव्वदीतील या अभिनेत्रीत झालाय प्रचंड बदल, शबाना आझमी यांच्यासोबत आहे हे नाते

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 19:21 IST

या अभिनेत्रीने नुकतीच रुग्णालयात जाऊन शबाना आझमी यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

ठळक मुद्देशबाना यांना सध्या कोकीळाबाई धीरूबाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना भेटण्यासाठी अभिनेत्री फराह नाज देखील आली होती. फराह ही त्यांची भाची असून तिने नव्वदीच्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी शनिवारी दुपारी कार अपघातात जखमी झाल्या. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ हा अपघात घडला होता. या अपघातात त्यांच्या कारचा चालक आणि त्यांना दुखापत झाल्यानंतर उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या अपघाताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे फोटो पाहून सगळ्यांनाच धक्का बसला होता. 

 

शबाना आझमी या रुग्णालयात असल्याची बातमी बॉलिवूडमध्ये पसरल्यानंतर अनेक सेलिब्रेटी रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत आहेत. त्यांना सध्या कोकीळाबाई धीरूबाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना भेटण्यासाठी अभिनेत्री फराह नाज देखील आली होती. फराह ही त्यांची भाची असून तिने नव्वदीच्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

90च्या दशकातील एक गाजलेला चेहरा म्हणजे, अभिनेत्री फराह नाज हिचा. अभिनेत्री तब्बूची मोठी बहीण फराह आज बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. पण याच फराहच्या सौंदर्याने एकेकाळी चाहत्यांना वेड लावले होते. 80 व 90 च्या दशकात फराहने अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले. राजेश खन्ना, ऋषी कपूर, संजय दत्त, गोविंदा, जॅकी श्रॉफ, मिथुन अशा अनेक अभिनेत्यांसोबत ती झळकली. अनेक हिट चित्रपट तिच्या नावावर आहेत. पण अचानक फराहने बॉलिवूडला अलविदा म्हटले. ही फरहा सध्या तिच्या संसारात आनंदी आहे.

करिअर शिखरावर असताना फराहने अचानक विंदू दारा सिंग याच्याशी लग्न केले. नव्वदीच्या दशकात एका चित्रपटाच्या सेटवर त्यांची ओळख झाली होती. काहीच महिन्यात दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. पण काहीच वर्षांत दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. फराहचा घटस्फोट झाल्यानंतर काहीच वर्षांत तिची ओळख सुमीत सेहगल या अभिनेत्यासोबत झाली. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले. विंदू आणि फराहच्या पहिल्या मुलाला देखील सुमीतने स्वीकारले.

टॅग्स :शबाना आझमी