Join us

आता अशी दिसते कल हो न हो या चित्रपटातील छोटी जिया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 1:01 PM

कल हो ना हो या चित्रपटातील चिमुकली जिया तर प्रेक्षकांना खूप आवडली होती. ही जिया सध्या काय करते तुम्हाला माहीत आहे का? या चित्रपटाच जियाची भूमिका झनक शुक्लाने साकारली होती.

ठळक मुद्देकल हो ना हो या चित्रपटाच जियाची भूमिका झनक शुक्लाने साकारली होती. गेल्या १५ वर्षांत तिच्यात खूपच बदल झाला आहे. सोशल मीडियावर ती अॅक्टिव्ह असल्याने तिचे आताचे फोटो आवर्जून पाहायला मिळतात. तिची आई सुप्रिया शुक्ला या कुमकुम भाग्य या मालिकेत काम करतात. झनक आता बीएला असून तिला सामाजिक कार्य करायचे आहे. एक एनजीओ उघडण्याची तिची इच्छा आहे. घरगुती हिंसेला बळी पाडणाऱ्या महिलांसाठी तिला एनजीओ सुरू करायचे आहे.

करण जोहरच्या कल हो ना हो या या चित्रपटाला नुकतीच १५ वर्षं पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाला १५ वर्षं झाल्याबद्दल करण जोहरने इन्स्टाग्रामला एक व्हिडिओ शेअर करून या व्हिडिओद्वारे या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेच्या आठवणींना उजाळा दिला होता. करणने आजवर अनेक चित्रपट दिग्दर्शित, निर्मित केले असले तरी त्याच्यासाठी कल हो ना हा हा चित्रपट खूप खास असल्याचे इन्स्टाग्रामच्या या पोस्टद्वारे सांगितले होते.

कल होना हो या चित्रपटात शाहरुख खान, सैफ अली खान, जया बच्चन, दारा सिंग आणि प्रिती झिंटा यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटात शाहरुख खान एका वेगळ्या अंदाजात त्याच्या फॅन्सना पाहायला मिळाला होता. या चित्रपटाची कथा, गाणी, कलाकारांचे अभिनय सगळे प्रेक्षकांना प्रचंड भावले होते. या चित्रपटाला अनेक फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते. त्याचसोबत या चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले होते. या चित्रपटाच्या गाण्यांसाठी शंकर-एहसान-लॉय यांना सर्वोत्कृष्ट संगीतकार तर सोनू निगमला सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिळाला होता.

कल हो ना हो या चित्रपटातील चिमुकली जिया तर प्रेक्षकांना खूप आवडली होती. ही जिया सध्या काय करते तुम्हाला माहीत आहे का? या चित्रपटाच जियाची भूमिका झनक शुक्लाने साकारली होती. गेल्या १५ वर्षांत तिच्यात खूपच बदल झाला आहे. सोशल मीडियावर ती अॅक्टिव्ह असल्याने तिचे आताचे फोटो आवर्जून पाहायला मिळतात. तिची आई सुप्रिया शुक्ला या कुमकुम भाग्य या मालिकेत काम करतात. या मालिकेत त्या श्रुती झाच्या आईची भूमिका साकारतात तर तिचे वडील हरी शुक्ला हे फिल्ममेकर आहेत.

झनक आता बीएला असून तिला सामाजिक कार्य करायचे आहे. एक एनजीओ उघडण्याची तिची इच्छा आहे. घरगुती हिंसेला बळी पाडणाऱ्या महिलांसाठी तिला एनजीओ सुरू करायचे आहे. झनकने सोनपरी, करिश्मा का करिश्मा यांसारख्या मालिकेत काम केले असले तरी आता अभिनयसृष्टीपासून दूर राहाण्याचे तिने ठरवले आहे. 

 

 

टॅग्स :झनक शुक्लाकरण जोहरशाहरुख खान