Join us

मृणाल आणि श्रेया बुगडेची ही मालिका आठवते का? छोट्या पडद्यावर होती विशेष गाजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 14:02 IST

Tv serial: श्रेयाने इन्स्टाग्रामवर तिच्या अनेक गाजलेल्या मालिकांविषयीच्या पोस्ट शेअर केली आहेत.

सोशल मीडियावर दररोज असंख्य पोस्ट व्हायरल होत असतात. यात खासकरुन कलाविश्वाशी निगडीत पोस्ट जास्त चर्चेत येतात.कधी कलाकारांचे लूक, कधी त्यांच्या बालपणीच्या आठवणी, काही वेळा एखाद्या सिनेमातील वा मालिकेतील संवाद असं असंख्य गोष्टी इंटरनेटवर आपल्याला पाहायला मिळतात. सध्या अशाच एका गाजलेल्या मालिकेतला फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री मृणाल दुसानीस, श्रेया बुगडे, क्षिती जोग यांसारख्या दिग्गज अभिनेत्री झळकल्या आहेत. मात्र, ही मालिका नेमकी कोणती असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

 चला हवा येऊ द्या च्या माध्यमातून विशेष लोकप्रिय असलेल्या श्रेयाने यापूर्वी अनेक हिंदी, मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. परंतु, हवा येऊ द्यामुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. श्रेया सोशल मीडियावर सक्रीय आहे. त्यामुळे कायम ती चाहत्यांसोबत नवनवीन पोस्ट शेअर करत असते.

श्रेयाने इन्स्टाग्रामवर तिच्या अनेक गाजलेल्या मालिकांविषयीच्या पोस्ट शेअर केल्या आहेत. यामध्येच तिने एका मराठी मालिकेविषयीदेखील पोस्ट शेअर केली आहे. या मालिकेत तिच्यासोबत अभिनेत्री मृणाल दुसानीस, क्षिती जोग, प्रिया मराठे, रमेश भाटकर, चिन्मय मांडलेकर, नेहा शितोळे अशी तगडी स्टारकास्ट झळकली होती. त्यामुळे ही मालिका नेमकी कोणती हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

दरम्यान, अनेक दिग्गज कलाकार असलेली ही मालिका म्हणजे  'तू तिथे मी'. या मालिकेत मृणाल आणि चिन्मय मुख्य भूमिकेत झळकले होते. यात मृणालने मंजिरी मुधोळकर ही भूमिका साकारली होती. तर, श्रेयाने मंजुषा होळकर ही व्यक्तिरेखा वठवली होती. २०१४ साली ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. 

टॅग्स :टेलिव्हिजनश्रेया बुगडेमृणाल दुसानीसप्रिया मराठेचिन्मय मांडलेकर