Join us

गंभीर आजाराने त्रस्त होते लक्ष्मीकांत बेर्डे, १६ वर्षापूर्वी घेतला होता जगाचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 1:17 PM

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी विनोदी भूमिकांसोबत अनेक गंभीर भूमिकाही तितक्याच ताकदीने निभावल्या. या भूमिकांमधून त्यांनी सशक्त अभिनयक्षमता दाखवली असली तरी विनोदी भूमिकांमुळे त्याच्यावरचा विनोदी अभिनेत्याचा शिक्का कायम राहिला.

कॉमेडीचं भन्नाट टायमिंग आणि कसदार अभिनयाच्या जोरावर लक्ष्मीकांत बेर्डेनं अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली. करियरमध्ये कितीही चढउतार आले तरी तो डगमगला नाही. अन् अवघं जगं जिंकून घेतल्याप्रमाणे सा-यांचा ‘लाडका लक्ष्या’ म्हणून त्यानं रसिकांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केलं. सा-याचा लाडका लक्ष्या अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे यानं सिनेमाच्या या रंगीत दुनियेत पाऊल ठेवल्यानंतर मराठी सिनेमाच नाहीतर नाटक आणि हिंदी सिनेमातूनही स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवत अनेक भूमिका अजरामर केल्या.

मराठीत यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना हिंदी चित्रपटातही लक्ष्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली. ‘राजश्री प्रॉडक्शन’च्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटात सलमान खानच्या मित्राची भूमिका त्याने छान निभावली. मात्र अभिनयाचा कस लागतील अशा भूमिका मराठीप्रमाणे हिंदीतही अभावानेच मिळाल्या. मराठीत ‘एक होता विदूषक’ गंभीर नाटकातील भूमिकेने लक्ष्मीकांतच्या अभिनयक्षमतेवर शिक्कामोर्तब झाले. पण तशा भूमिका लक्ष्याच्या वाट्याला फार काही आल्याच नाहीत.

लक्ष्यानं विनोदी भूमिका जितक्या सहजतेनं आणि लीलया निभावल्या तितक्याच निष्ठेनं अनेक गंभीर भूमिकांनाही त्यानं शंभर टक्के न्याय दिला. मात्र अभिनयाची अष्टपैलू ओळख निर्माण करणा-या अशा गंभीर भूमिका लक्ष्याच्या वाट्याला फार कमी आल्या.

 

विनोदी भूमिकांसोबत अनेक गंभीर भूमिकाही तितक्याच ताकदीने निभावल्या. या भूमिकांमधून त्यांनी सशक्त अभिनयक्षमता दाखवली असली तरी विनोदी भूमिकांमुळे त्याच्यावरचा विनोदी अभिनेत्याचा शिक्का कायम राहिला.

 असा हा चतुरस्त्र आणि विनोदाचा बादशहा असलेला कलाकार चाहत्यांना अखेर पर्यंत हसवत राहिला. किडणीसारख्या महाभयंकर आजाराची चाहूल कुणालाही लागू न देता सा-यांच्या लाडक्या लक्ष्यानं १६ डिसेंबर २००४ ला जगाचा निरोप घेतला. मात्र त्यानं साकारलेल्या भूमिका प्रत्येक रसिकाच्या मनात आजही ठसठशीतपणे कोरल्या गेल्यात. त्यामुळं लक्ष्या तुला विसरणं कुणालाही शक्य नाही. 

टॅग्स :लक्ष्मीकांत बेर्डेप्रिया बेर्डे