Join us

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना सुंदर बनवण्यासाठी 'या' मराठमोळ्या कलाकाराचा होता हात,जवळपास 8 वर्ष केले त्यांच्यासह काम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 3:45 PM

श्रीदेवी यांच्या प्रत्येक आवडीनिवडीनुसार सगळ्या गोष्टी सजवण्यात आल्या होत्या. श्रीदेवी यांना मोग-याची पांढरी फुलं आवडायची. त्या फुलांनी सगळा सेलिब्रेशन हॉल सजवण्यात आला होता.

हिंदी चित्रपटसृष्टीची चांदनी म्हणजेच दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा आज वाढदिवस. 13 ऑगस्ट 1963 रोजी तामिळनाडूच्या शिवकाशी येथे त्यांचा जन्म झाला होता. वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा चांदणीच्या आठणीत सारेच भावूक झाले आहेत. कुटुंबियांप्रमाणेच रसिकांच्याही मनात श्रीदेवी कायम घर करून आहेतच. त्यांच्यासह काम करणा-या प्रत्येकाला आज श्रीदेवी यांची कमी भासते. कुटुंबाप्रमाणेच त्यांच्यासह काम करणारी प्रत्येक व्यक्तीही श्रीेदेवी यांच्यासाठी खासच होती. 

श्रीदेवी यांच्यासह काम करणं हे कोणत्याही कलाकारांसाठी ही भाग्याची गोष्ट असते. त्यांच्यासह अशाच एका कालाकाराला काम करायला मिळालं. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. जवळपास 8 वर्ष त्याला श्रीदेवीसह काम करण्याची संधी मिळाली तो होता एक मराठमोळा तरूण सुभाष शिंदे. चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री श्रीदेवी आज आपल्यात नाहीत. 24 फेब्रुवारी रोजी दुबईत श्रीदेवी यांनी अखेरचा श्वास घेतला.  

सुभाष शिंदे सतत त्यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहायचा. सुभाष श्रीदेवी यांच्या अतिशय जवळची व्यक्ती होती. सुभाष हे श्रीदेवी यांचे मेकअप आर्टिस्ट होते. अगदी दुबईत झालेल्या लग्नाच्या वेळी जेव्हा श्रीदेवी यांनी त्यांच्या चेह-याला शेवटचा रंग लावला.  चित्रपट असो, पार्टी असो, किंवा फॅमिली फंक्शन असो सुभाष हेच श्रीदेवी यांचा मेकअप करत असतं. श्रीदेवी यांच्या गाजलेल्या 'पुली' आणि 'मॉम' या चित्रपटांसाठी सुभाष शिंदेनेच श्रीदेवी यांचा मेकअप केला होता. मेकअप करणे श्रीदेवी यांना फार आवडायचे म्हणूनच अगदी अंत्यसंस्कारा आधी त्यांचा खास मेकअप करण्यात आला होता. 

 श्रीदेवी यांच्या अंत्यदर्शनासाठीच्या तयारीची व्यवस्था कशी असेल याचीही काळजी घेण्यात आली होती. श्रीदेवी यांच्या प्रत्येक आवडीनिवडीनुसार सगळ्या गोष्टी सजवण्यात आल्या होत्या. श्रीदेवी यांना मोग-याची पांढरी फुलं आवडायची. त्या फुलांनी सगळा सेलिब्रेशन हॉल सजवण्यात आला होता. 

टॅग्स :श्रीदेवी