गेल्या शुक्रवारी डिसेंबर रोजी बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर, दिग्दर्शक रेमो डिसूझाला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि पाठोपाठ त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. रेमो अद्यापही रूग्णालयात आहे. यादरम्यान रेमोचा रूग्णालयातील एक व्हिडीओ व्हायरल होतोय.रेमोची पत्नी लिजेलने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात रेमो संगीताच्या तालावर पाय थिरकवताना दिसतोय. ‘पायांनी नाचणे वेगळे आणि हृदयातून नाचणे वेगळे, तुमच्या प्रार्थना आणि आशीर्वादासाठी आभार,’ असे कॅप्शन तिने हा व्हिडीओ शेअर करताना दिले आहे.
तूर्तास रेमोचे चाहते तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकारही रेमो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील रेमोसाठी ट्विट केले आहे.
अमिताभ यांनी ट्विटरवर एका चाहत्याने शेअर केलेला व्हिडीओ रिट्विट केला आहे. हा व्हिडीओ रिट्विट करत त्यांनी ‘रेमो लवकर बरा हो. तू लवकर बरा व्हावा म्हणून मी देवाकडे प्रार्थना करतो.. आणि तुम्ही सर्वांनी रेमोसाठी प्रार्थना केली त्याबद्दल तुमचे आभार,’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसुजाला शुक्रवारी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी मुंबईतील कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रेमोला बघण्यासाठी धर्मेश आणि आमीर अली हॉस्पिटलमध्य पोहोचले होते. रेमो अजूनही आयसीयूमध्ये आहे. शुद्धीवर आहे. त्याच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे. रेमोची पत्नी लिजेल ही कॉस्च्युम डिझायनर आहे. तिला आणि रेमोला दोन मुलं आहेत.