Join us

Video : लोक मला कालिया, कालू म्हणायचे, राग यायचा पण..., रेमो डिसूजाने पोस्टमधून सांगितला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 2:28 PM

Remo Dsouza : रेमो सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. तूर्तास त्याच्या नव्या व्हिडीओची चर्चा आहे.

रेमो डिसूजाची (Remo Dsouza) आताश: नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. आजघडीला तो बॉलिवूडचा दिग्गज कोरिओग्राफर आणि डायरेक्टर म्हणून ओळखला जातो. सोशल मीडियावरही त्याची मोठी फॅन फॉलोइंग आहे. रेमो सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. तूर्तास त्याच्या नव्या व्हिडीओची चर्चा आहे. रेमोने पत्नी लिजेलसोबतचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. पण या व्हिडीओपेक्षा या व्हिडीओला त्याने दिलेल्या कॅप्शनने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

व्हिडीओत रेमोने ‘हम काले हैं तो क्या हुआ दिलवाले है’ या गाण्यावर लिजेलसोबत मस्ती करताना दिसतोय. व्हिडीओ मजेशीर आहे. पण या व्हिडीओला रेमोने दिलेलं कॅप्शन खूप काही सांगणारे आहे.

‘लोक मला कालिया, कालू म्हणायचे तेव्हा खूप राग यायचा. पण आईने मला सांगितलं, रंग नाही तर तुमचं मन कसं आहे, ते महत्त्वाचं आहे. तेव्हापासून हे गाणं माझं आवडतं गाणं बनलं. आता मी ते माझी पत्नी लिजेलसाठी गातो...,’असं रेमोने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. रेमोच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. 

 रेमोचा जन्म 2 एप्रिल 1974 साली बेंगळुरुमधल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. रेमोचे वडील गोपी नायर हे इंडियन एयरफोर्सचे आॅफिसर होते. रेमोला आज जे यश मिळाले आहे त्यासाठी त्याला प्रचंड स्ट्रगल करावे लागले.

रेमोने 10 वीपर्यंतचे शिक्षण गुजरातमधील जामनगरमधून पूर्ण केले. रेमोच्या वडिलांचे स्वप्न होते की त्यांने एअरफोर्स ज्वाईन करावे मात्र रेमोला डान्समध्ये करिअर करायचे होते. रेमोने डान्ससाठी कोणतीच प्रोफेशनल ट्रेनिंग घेतलेली नाही. शाळेत तो अनेक वेळा फंक्शना डान्स करायचा.   चित्रपट आणि म्युझिक व्हिडिओ बघून डान्स शिकला आहे.  मित्रांच्या मदतीने तो मुंबईत आला. त्यांने मुंबईत डान्स अ‍ॅकेडमी सुरु केली. सुरुवातीला त्याच्याकडे फक्त 4 स्टुडेंट्स होते ज्यांची संख्या हळुहळु वाढत गेली.   पावसाळ्यात त्याच्याकडे डान्स शिकायला कोणीच यायचे नाही. त्यामुळे त्याच्याकडे जेवायला पैसे नसायचे.  पण रेमो हिंमत हरला नाही. आज तो बॉलिवूडचा दिग्गज सेलिब्रिटी म्हणून ओळखला जातो.

टॅग्स :रेमो डिसुझाबॉलिवूड