सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूचा तपास बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणापर्यंत पोहोचला आहे आणि सारा अली खानचे नाव यात आले आहे. या प्रकरणात एनसीबीने ड्रग्स आणि सारा -सुशांतबरोबरच्या संबंधांबद्दल तिच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. असे दिसते आहे की या प्रकरणात साराचे वडील सैफ अली खान तिला मदत करण्याच्या कोणत्याही मूडमध्ये नाहीत.
ड्रग्स प्रकरणात आपल्या मुलीला सैफला मदत करायची इच्छा नाही?नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, सारा अली खान सध्या चारही बाजूने या प्रकरणात अडकली आहे मात्र यातून बाहेर पडण्यासाठी ती सैफवर अजिबात अवलंबून राहिलेली नाही. रिपोर्टनुसार सैफ आली खान या प्रकरणात सारा अली खानची कोणतीच मदत करत नाहीय.
सैफने अमृता सिंगलाही फटकारले नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार सैफने पूर्वपत्नी अमृता सिंगला सुद्धा चांगलेच फटकारले आहे, जी मुलीच्या करिअ संबंधित जवळजवळ सर्व निर्णय घेते. सैफ अली खान पत्नी करिना कपूरसोबत दिल्लीत रवाना झाला आहे.
एनसीबीच्या चौकशी दरम्यान काय म्हणाली होती सारा? शुक्रवारी सारा अली खानला एनसीबीने चौकशीसाठी बोलवलं होतं. यावेळी ड्रग्स केस आणि सुशांतबाबत तिची चार तास चौकशी करण्यात आली. असेही सांगितले जात आहे की, या चौकशीदरम्यान साराने सुशांतसोबतच्या नात्याची कबुली दिली आहे. Pledgetimes.com च्या माहितीनुसार साराने एनसीबीला सुशांतसोबतच्या ब्रेकअपचं कारण सांगितलं. सुशांत त्यांच्या रिलेशनशिपमध्ये लॉयल नव्हता.रिलेशनशिपबाबत फार पझेसिव्ह नव्हता. तसेच त्याची साराने त्याला अधिकाधिक सिनेमाच्या ऑफर्स मिळवून देण्यासाठी मदत करावी. तसेच या सगळ्यात अडकायचे नव्हते. तिने तिचं करिअरही नुकतंच सुरू केलं होतं. त्यामुळे तिला तिच्या करिअरवर फोकस करायचं होतं त्यामुळे ते वेगळे झाले.
व्हॅकेशनसाठी गोव्यालाच का जाते सारा अली खान? NCB चौकशीच्या एक दिवसाआधीचे फोटो आले समोर
सारा अली खानने सांगितलं सुशांतसोबत ब्रेकअपचं कारण, म्हणाली - 'तो लॉयल नव्हता'