Join us

3 storeys film review : तीन हळूवार कथांची गुंफन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2018 6:13 AM

‘३ स्टोरीज्’ या शीर्षकात या चित्रपटाचे सार लपलेले आहे. हा चित्रपट म्हणजे तीन वेगवेगळ्या कथांची एक शृंखला आहे, याचा अंदाज शीर्षकावरूनच बांधता येईल.

Release Date: March 09, 2018Language: हिंदी
Cast: रेणुका शहाणे, रिचा चड्ढा, शरमन जोशी, पुलकित सम्राट , मसुमेह मखीजा, आयशा अहमद, अंकित राठी
Producer: फरहान अख्तर, रितेश सिधवानी, प्रिया स्रीधरणDirector: अर्जुन मुखर्जी
Duration: १ तास ४० मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स
-जान्हवी सामंत
 
‘३ स्टोरीज्’ या शीर्षकात या चित्रपटाचे सार लपलेले आहे. हा चित्रपट म्हणजे तीन वेगवेगळ्या कथांची एक शृंखला आहे, याचा अंदाज शीर्षकावरूनच बांधता येईल. शीर्षकाला साजेशा अशा एका तीन मजिली इमारतीत राहणाºया लोकांच्या तीन वेगवेगळ्या कथा यात दाखवल्या आहेत. माया नगर या मुंबईच्या तीन मजली चाळीत राहणारी साठीच्या घरातील कॅथलिक महिला फ्लोरी, तिशीची वर्षा आणि  तारूण्याच्या उंबरठ्यावरची मालिनी अशा तिघींचा भूतकाळाचा वेध घेणा-या या कथा एकमेकांत  गुंफल्या गेल्या आहेत.पहिली कथा आहे फ्लोरीची (रेणुका शहाणे). मायनगरमधील वयोवृद्ध फ्लोरी सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारी आणि आत्मविश्वासाने भरलेली महिला आहे. तिला आपले घर विकायचे असते. सुदीप (पुलकीत सम्राट) तिचे हे घर खरेदी करायला येतो. त्याच्यासोबत चर्चा करताना फ्लोरी अचानक भूतकाळात रमते. फ्लोरीचा मुलगा चोरी करताना पकडला जातो आणि पोलिस कोठडीतचं त्याचा मृत्यू होतो, हा सगळा भूतकाळ आणि कथेचे सगळे तार सुदीपपर्यंत येऊन पोहोतात. दुसरी कथा आहे, वर्षाची(मसुमेह मखीजा). वर्षा आणि तिच्या शेजारी राहणारी सुहाना या दोघींची जिवाभावाची मैत्री असते. पण सुहानाकडे ते सगळे असते जे वर्षाकडे नसते. दृष्ट लागावा असा संसार, काळजी घेणारा पती आणि आनंद असे सगळे काही सुहानाकडे असते. याऊलट  एका बेरोजगार, नशेच्या आहारी गेलेल्या आणि सतत मारहाण करणाºया पतीच्या खुंटीला वर्षा बांधली गेली असते. शंकर वर्मा (शरमन जोशी) हा वर्षाचा प्रियकर असतो. पण त्याच्याशी लग्न न होता वर्षाचे या व्यसनी पुरुषाशी लग्न होते. आपल्या दारूड्या पतीपासून तिला सुटका हवी असते. यातच सुहानाचा दुबईत नोकरी असलेला नवरा मुंबईत येतो आणि वर्षाच्या आयुष्याला एकदम वेगळी कलाटणी मिळते. तिसºया कथेत दिसते ती मालिनी(आयशा अहमद). १८ वर्षांची मालिनी सुहैल (अंकित राठी) या मुस्लिम तरूणाच्या प्रेमात आंकठ बुडालेली असते. मालिनीच्या आईचा या दोघांच्या प्रेमाला टोकाचा विरोध असतो. पण जितका हा टोकाचा विरोध असतो, तितकेच   सुहैल आणि मालिनीचे प्रेम बहरत असते. एकदा चाळीतील दांडियाच्या रात्री आई मालिनीला सुहैलला भेटायला मनाई करते. हा विरोध सुहैल व मालिनी लग्नासाठी घरातून पळून जायला भाग पाडतो. पण या वळणावर त्यांच्या लव्हस्टोरीला अनपेक्षित कलाटणी मिळते. या तिन्ही कथांच्या मध्ये चाळीत राहणारी नखरेल लीला (रिचा च्ड्ढा) प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. अर्थात या लीलाची भूमिका काय, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहात जावून चित्रपट बघावा लागेल. 
दिग्दर्शक अर्जुन मुखर्जी यांनी  अनेक नायिकांसोबत तीन वास्तववादी कथा चित्रपटात मांडल्या आहेत. नेहमीच्या बॉलिवूड चित्रपटापेक्षा वेगळ्या पद्धतीने अतिशय हळूवार पद्धतीने प्रत्येक कहानी उलगडत जाते आणि हळूहळू तिन्ही कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.  या कथा सांगण्याची पद्धत मनाला भावते. चित्रपटाचा पहिला भाग उत्तम आहे.   दुसºया भागात मात्र चित्रपट आपला सूर हरवून बसतो. दुसºया भागाची सुरुवात कमालीची संथ होते. शेवटच्या २० मिनिटांपर्यंतहा संथपणा कंटाळा आणतो आणि नेमक्या याचमुळे चित्रपटाचा क्लायमॅक्स निराश करतो. पण याऊपरही हा चित्रपट मनाला भावतो. त्यामुळे एकदा तरी हा चित्रपट नक्कीचं पाहायला हवा.