Join us

'Aashram 2 'मध्ये सुटतो पहिल्या भागाचा गुंता !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 11:56 AM

प्रकाश झा यांनी या भागात समाजाता घडणा-या वाईट प्रवृत्तीवर घटनांवर  प्रकाश टाकला आहे.

Release Date: November 11, 2020Language: हिंदी
Cast: बॉबी देओल, चंदन रॉय सान्याल, अदिति पोहनकर, त्रिधा चौधरी, दर्शन कुमार, अनुप्रिया गोयनका
Producer: Director: प्रकाश झा
Genre:
लोकमत रेटिंग्स

प्रकाश झा दिग्दर्शित 'आश्रम' या वेब सीरिज दुसरा भाग  एमएक्स प्लेयर या डिजिटल प्लॅटफॉर्वर प्रदर्शित झाला आहे. या वेब सीरिजचा पहिला भागानंतर दुस-या भागाची रसिक आतुरतेने वाट पाहात होते. दुस-या भागाला देखील रसिकांनी तुफान पसंती दिली आहे.  विशेष म्हणजे  बॉबी देओलने साकारलेल्या भूमिकेचे सर्वच स्थरांवरून कौतुक होत आहे. पहिल्या भागात जिथे कथा संपली होती तेथुनच दुस-या भागात पुढच्या कथेला ख-या अर्थाने सुरूवात होते. आश्रम पार्ट टु बघण्याआधी पहिला भाग जर तुम्ही पाहिला असेल तर दुसरा भाग पाहणे तुमच्यासाठी रंजक ठरेल.

बॉबी देओल  ‘निराला बाबा’ आश्रमात ‘काशीपुरवाले’ याची भूमिका साकारली आहे. पहिल्या भागात  जे लोक त्याचे शिकार बनतात तेच लोक दुस-या भागात त्याचा बदला घेण्यासाठी येतात. बाबाच्या संपर्कात आल्यानंतर  बबीता  (त्रिधा चौधरी) आणि पम्मी (अदिति पोहनकर) यांचे आयुष्य फार बदलले असते पूर्वीसारखे त्यांचे आयुष्य राहात नाही.  पोलिस इंस्पेक्टर उजागर सिंह (दर्शन कुमार) आणि डॉक्टर नताशा कटारिया (अनुप्रिया गोयनका) या मिशनमध्ये स्वतःला झोकुन देतात. बाबाची खरी कहाणी समोर आणण्याचा पुरेपुर प्रयत्न करतात.  9 भागात बनलेली ही वेब सिरीज पहिल्या भागापेक्षा अधिक रंजक बनली आहे. त्यामुळे दुसरा भाग रसिकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतो. 

या भागात आश्रमचे लेखक माधवी भट्ट, अविनाशकुमार, संजय मसूम, कुलदीप रुहेल यांनी लैंगिक अत्याचाराबाबत आणि मादक पदार्थांच्या गैरवापराचा मुद्द्याला वाचा फोडली आहे. कथेला साजेशी अशी योग्य पात्रांची निवड करण्यात आली असून  प्रत्येक कलाकाराने त्याच्या वाट्याला आलेली  भूमिकेला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रकाश झा यांनी या भागात समाजाता घडणा-या वाईट प्रवृत्तींवर घटनांवर  प्रकाश टाकला आहे.

पहिल्या भागाप्रमानेच दुस-या भागातही बॉबी देओल आपल्या अभिनयाने रसिकांचं तुफान मनोरंजनही करतो. त्याच्या अभिनयात एक वेगळीच सहजता दिसते त्यामुळे रसिकांना खिळवून ठेवण्यात तो यशस्वी ठरतो. बऱ्याच काळानंतर त्याला वेगळ्याच अंदाजात पाहणे नक्कीच चाहत्यांचाही आनंद द्विगुणित करणारा आहे.

चंदन रॉय सान्याल  रसिकांचं तुफान मनोरंजन करतो. अदिति पोहनकर, त्रिधा चौधरी, अनुरिता झा, प्रीति सूद आणि अनुप्रिया गोयनका त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिकेतून रसिकांवर प्रभाव पाडण्यात यशस्वी होतात. त्रिधा चौधरीने बबीता मोठ्या खुबीने साकारलीय. पहिल्या भागाप्रमाणेच या भागातही तिने आपल्या भूमिकेला पुरेपुर न्याय दिला आहे.

दिग्दर्शक सगळ्या कलाकारांकडून चांगला अभिनय करून घेण्यात यशस्वी ठरले आहेत. उत्तम कथेसह कलाकारांची तगडी फौज असलेला 'आश्रम चॅप्टर २' नक्कीच  रसिकांसाठी  मनोरंजनाची पर्वणची ठरेल यांत शंका नाही.

टॅग्स :आश्रम चॅप्टर २बॉबी देओल