संदीप आडनाईक कथानक : ‘आर्या’चा दुसरा सीझन एका आईचा प्रवास मांडतो. ती स्वत:ला आणि तिच्या मुलांना न दिसणाऱ्या वाईट घटनांपासून वाचविण्यासाठी गुन्हेगारीशी आणि गुन्हेगारांच्या अंधाऱ्या जगाशी लढते. गृहिणी आणि आई होण्याबरोबरच डॉन बनलेल्या एका महिलेची ही कथा आहे. दिग्दर्शन : क्राइम थ्रिलरमध्ये जेव्हा भरपूर ट्विस्ट आणि वळणं येतात, तेव्हा ते आकर्षक ठरतात. ‘आर्या सीझन २’मध्ये भरपूर ट्विस्ट आहेत. विनोद रावत आणि कपिल शर्मा यांच्यासोबत सह-दिग्दर्शित केलेली ही वेबसिरीज राम माधवानी यांनी रोमांचक केली आहे. ‘आर्या’ ही डच मालिका ‘पेनोझा’चे अधिकृत रूपांतर आहे. लेखक चावला शेख आणि अनू सिंग चौधरी यांनी आर्याच्या आयुष्यातील चढ-उतार, तसेच प्रेम, निष्ठा, विश्वासघात आणि कौटुंबिक संबंधांची बदलणारी समीकरणे, मूळ तत्त्वाशी खरी राहून उत्तम प्रकारे विणली आहेत. सिनेमॅटोग्राफीमध्ये राजस्थानची विलक्षण वास्तुकला आणि शहराचे शाही वातावरण दाखविता आला असता. अभिनय : एक दु:खी पत्नी, घाबरलेली आई आणि गुन्हेगारांशी विश्वासाने सामना करणारी एक कठोर स्त्री असे आर्याचे विविध पैलू सुष्मिताने आपल्या अभिनयातून वेगवेगळे साकारले आहेत. हा क्राइम ड्रामा, त्याच्या प्रिक्वेलप्रमाणे, सुष्मिताच्या अभिनयक्षमतेवर पेललेला आहे. एकूणच सुष्मिताने संपूर्ण शोमध्ये एक संयमित उंची राखली आहे. याशिवाय हिना (सुगंधा गर्ग), राजेश्वरी (सोहेला कपूर), माया (माया सरो), इन्स्पेक्टर आहे. सुशीला शेखर (गीतांजली कुलकर्णी), एसीपी खानच्या भूमिकेत विकास कुमार, जोडीदार अजय कुमार (निशांक वर्मा) यांनी रंग भरला आहे.
आर्या 2: सुष्मिता सेनचे क्राइम थ्रिलर
By संदीप आडनाईक | Published: December 13, 2021 10:08 AM