-गीतांजली आंब्रे‘अक्सर2’ हा चित्रपट आज शुक्रवारी रिलीज झाला. अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित हा चित्रपट २००६ मध्ये आलेल्या ‘अक्सर’चर सीक्वल आहे. गौतम रोडे, अभिनव शुक्ला, जरीन खान आणि मोहित मदान अशी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट गौतम रोडेसाठी महत्त्वाचा आहे. कारण या चित्रपटाद्वारे गौतम बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. केवळ तोच नाही तर क्रिकेटनपटू एस. श्रीसंत यानेही या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एक नवी इनिंग सुरु केली आहे. त्यामुळे हा चित्रपट कसा आहे, याबदद्ल उत्सुकता होती.चित्रपटाची सुरुवात होते ती,अब्जावधी रूपयांची मालकीन मिसेस खंबाटा (लिलेट दुबे) हिच्यापासून. मिसेस खंबाटा आपल्या देखभालीसाठी तिचा मॅनेजर पॅट (गौतम रोड) याला एका महिलेचा शोध घ्यायला सांगते. याचदरम्यान ग्लमरस शीना रॉय (जरीन खान) या नोकरीसाठी अर्ज करते. मिसेस खंबाटाच्या देखभालीसाठी इतकी सुंदर मुलगी येईल,असे पॅटला स्वप्नातही वाटले नसते. अर्थात मिसेस खंबाटा शीनाला नोकरीवर ठेवण्यास नकार देते. पण पॅटला ती हवी असते. मिसेस खंबाटांना कसेबसे तयार करवत तो शीना ही नोकरी मिळवून देतो. पण या नोकरीसाठी आपल्याला इतकी मोठी किंमत चुकवावी लागेल, हे तोपर्यंत तरी शीनाला ठाऊक नसते. नोकरीच्याबदल्यात पॅट शीनाकडे फेवर मागतो आणि नकार दिल्यास नोकरीवरून काढण्याची धमकी देतो. बॉयफ्रेन्ड रिक्कीच्या मदतीसाठी शीना पॅटची मागणी मान्य करते. पण कालांतराने पॅट एका स्कँडलमध्ये अडकतो. त्याचे आयुष्य आणि करिअर सगळे काही बर्बाद होते. पॅटचे आयुष्य बर्बाद करण्यात कुणाचा हात असतो? काय शीनाचा मिसेस खंबाटाकडील नोकरीमागे काही प्लान असतो? निश्चितपणे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला चित्रपटचं बघावा लागेल.चित्रपटाची कथा इंटरेस्टिंग वाटत असली तरी हा चित्रपट अनेक स्तरावर निराश करतो. याचे कारण म्हणजे, चित्रपटाचे अतिशय कंटाळवाणे संवाद आणि कलाकारांचा अभिनय. काही ठिकाणी गौतम व जरीन दोघांचाही अभिनय प्रभावित करतो. पण संपूर्ण चित्रपटाचे म्हणाल तर त्यांचा अभिनय बराच वरवरचा वाटतो. ग्लॅमडॉल बनण्यापलिकडे जरीनने काहीही केलेले नाही, हे जाणवते. गौतमचा हा बॉलिवूड डेब्यू सिनेमा असूनही त्याच्या चेहºयावरचे भाव कुठेच बदलत नाही. संपूर्ण चित्रपटात तो एकच चेहरा घेऊन वावरतो. मॅडम खंबाटाच्या रोलमधील लिलेट दुबे हिने आपले बेस्ट दिलेय. जरीनच्या बॉयफ्रेन्डची भूमिका साकारणाºया अभिनव शुक्लाचा अभिनयही चांगला आहे. पण त्याच्या वाट्याला चित्रपटात फार काही भूमिका नाही. मॅडम खंबाटाच्या वकीलाच्या भूमिकेत श्रीसंत ब-यापैकी जमून आलाय. २००६ मध्ये आलेल्या या चित्रपटाचा पहिला पार्ट लोकांना आवडला होता. यातील गाणी लोकांना प्रचंड भावली होती. पण ‘अक्सर2’ कुठलाही प्रभाव सोडत नाही. चित्रपटाचा दुसरा भाग अनेक टिष्ट्वस्टनी भरलेला आहे. पण अनपेक्षित वळणांची कथा आपल्या मार्गावरून भरकटल्याचे जाणवते. त्यामुळेच सुरुवात चांगली होऊन दुस-याच क्षणाला हा चित्रपट कंटाळवाणा होतो. जरीन खानची बोल्ड दृश्ये आणि दर दहा मिनिटाला येणारे किसींग सीन्स यापेक्षा चित्रपटाच्या दुसºया भागावर मेहनत घेतली गेली असती तर कदाचित हा चित्रपट काही वेगळाच असता. कदाचित पहिल्या पार्ट इतकाच लोकांना खिळवून ठेवू शकला असता.