Join us

मुखवटे आणि चेहऱ्यांची पोलखोल! कसा आहे अक्षय कुमार आणि तापसी पन्नूचा 'खेल खेल में', वाचा रिव्ह्यू

By संजय घावरे | Published: August 16, 2024 4:51 PM

'खेल खेल में' हा चित्रपट २०१६मध्ये आलेल्या 'परफेक्ट स्ट्रेंजर्स' या इटालियन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. यात एक असा खेळ आहे जो ओळखीच्या चेहऱ्यांवरील मुखवटे फाडून टाकत त्यांच्या अंतरंगात दडलेले अनोळखी चेहरे समोर आणत थेट पर्दाफाश करतो.

Release Date: August 15, 2024Language: हिंदी
Cast: अक्षय कुमार, तापसी पन्नू, अॅमी विर्क, वाणी कपूर, फरदीन ख़ान, आदित्य सील, प्रज्ञा जयसवाल
Producer: भूषण कुमार, कृष्ण कुमार, विपुल शाह, शशिकांत सिन्हा, अश्विन वर्दे, राजेश बहलDirector: मुदस्सर अझीझ
Duration: २ तास १४ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

दिग्दर्शक मुदस्सर अझीझ यांचा हा चित्रपट २०१६मध्ये आलेल्या 'परफेक्ट स्ट्रेंजर्स' या इटालियन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. यात एक असा खेळ आहे जो ओळखीच्या चेहऱ्यांवरील मुखवटे फाडून टाकत त्यांच्या अंतरंगात दडलेले अनोळखी चेहरे समोर आणत थेट पर्दाफाश करतो.

कथानक : वरुणच्या लग्नाचं औचित्य साधत रिषभ-वर्तिका, हरप्रीत-हरप्रीत (हॅपी), समर-नैना या जोड्यांसोबतच कबीर हे सात मित्र एकत्र येतात. गप्पांची मैफिल जमते आणि त्या ओघात एक गेम सुरू होतो. प्रत्येकाने आपला मोबाईल टेबलावर ठेवायचा. जो मोबाईल पहिल्यांदा वाजेल तो उचलायचा आणि त्यावरील कॅाल स्पीकरवर रिसिव्ह करायचा, एसएमएस तसेच ईमेल सार्वत्रिकपणे वाचायचे आणि सकाळपर्यंत कोणीही मोबाईल खासगीत वापरायचा नाही. काय खेळ सुरू होताच एकेकाची रहस्ये उघड होतात. त्यानंतर झालेला गोंधळ आणि सुटलेले प्रश्न यात आहेत.

लेखन-दिग्दर्शन : एका नावीन्यपूर्ण संकल्पनेवर सुरेख पटकथा लिहिली आहे. मूळ चित्रपट जरी इंग्रजीत असला तरी मांडलेले मुद्दे भारतीय प्रेक्षकांना रिलेट होणारे आहेत. संवाद आणि कलाकारांमधील अॅक्शन-रिअॅक्शन काही ठिकाणी हास्याची कारंजी फुलवते. हरप्रीत आणि कबीर यांच्या मोबाईल अदलाबदलीमुळे होणारा गोंधळ उत्सुकता वाढवतो. आपली प्रिय व्यक्ती आपल्यापासून दुरावली जाईल या भीतीने मनुष्य कित्येक रहस्ये आपल्या मनातच दडवून ठेवतो. हा खेळ त्या रहस्यांची केवळ पोलखोल करत नाही, तर त्यामुळे झालेल्या जखमांवर फुंकर घालत निर्माण झालेला दुरावा दूर करतो. पंजाबी फ्लेव्हरची गाणी फारशी प्रभावी वाटत नाहीत.

अभिनय : यातील अक्षय कुमारची व्यक्तिरेखा खूप वेगळी असून, या अनुषंगाने आलेले सर्व पैलू त्याने सुरेखरीत्या सादर केले आहेत. तापसी पन्नूने तिच्या वाट्याला आलेली एकदम विरुद्ध व्यक्तिरेखा पूर्ण ताकदीनिशी साकारली आहे. वाणी कपूरच्या व्यक्तिरेखेतही काही अनोखे रंग आहेत. अॅमी विर्कने साकारलेला हरप्रीत आणि त्याचा असुरक्षित वाटणारा स्वभाव कायम एखाद्या आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या व्यक्तीची आठवण करून देतो. फरदीन खान थकल्यासारखा वाटतो. आदित्य सील आणि प्रज्ञा जयसवाल यांची जोडी छान जमली असून, दोघांनीही चांगलं काम केलं आहे.

सकारात्मक बाजू : नावीन्यपूर्ण विषय, पटकथा, दिग्दर्शन, संवाद, अभिनय, पंजाबी वातावरणनकारात्मक बाजू : नाटकासारखी कथा, गीत-संगीतथोडक्यात काय तर चेहऱ्यांवरील मुखवटे उतरवून खरे अंतरंगातील चेहरे दाखवणारा हा खेळ वेळ असल्यास नक्की पाहायला हवा. 

टॅग्स :अक्षय कुमारतापसी पन्नू