Join us

​‘ऐ दिल है मुश्किल’ : प्रेमाची संगीत खुर्ची

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2016 6:01 PM

करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ अडथळ्यांची शर्यत पार करत अखेर आज शुक्रवारी रिलीज झाला. पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याच्या चित्रपटातील सहभागामुळे हा चित्रपट वाद्यांत सापडला. पण हा गुंता करणने अगदी अलगद सोडवला आणि ‘ऐ दिल है मुश्किल’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला.

Release Date: October 28, 2016Language: हिंदी
Cast: रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, ऐश्वर्या राय बच्चन, फवाद खान, लीजा हेडन, इमरान अब्बास
Producer: अपूर्व मेहता, हीरू यश जोहर, करण जोहरDirector: करण जोहर
Duration: 158 मिनिटGenre:
लोकमत रेटिंग्स
जान्हवी सामंतकरण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ अडथळ्यांची शर्यत पार करत अखेर आज शुक्रवारी रिलीज झाला. पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याच्या चित्रपटातील सहभागामुळे हा चित्रपट वाद्यांत सापडला. पण हा गुंता करणने अगदी अलगद सोडवला आणि ‘ऐ दिल है मुश्किल’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. खरे तर ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाला चित्रपट प्रेमाची संगीत खुर्ची म्हटले तर वावगे ठरणार नाही. आयन(रणबीर कपूर) हा आलिझा(अनुष्का शर्मा)वर जीवापाड प्रेम करतो. पण आलिझाला त्याच्यात केवळ एक मित्रच दिसतो. आयनला हवी असते ‘मुहब्बत’ आणि आलिझाला हवी असते ‘दोस्ती’. या दोघांच्या ‘मुहब्बत’ आणि ‘दोस्ती’चा लपंडाव सुरु असताना आयन सबाला (ऐश्वर्या राय बच्चन) ला भेटतो. सबावर अद्यापही तिचा पूर्वाश्रमीचा पती ताहिर तितकेच जीवापाड प्रेम करत असतो. पण ऊर्दू शायरींच्या जगात रमणाºया सबाच्या आयुष्यात नात्याला मुळीच स्थान नसते. अर्थात तरीही ती आयनच्या प्रेमात पडते. पण आयनला अजूनही आलिझाचेच प्रेम खुणावत असते. खरे तर कथा फार गुंतागुंतीची नाहीच. पण  ‘ऐ दिल है मुश्किल’  पाहताना  चित्रपटाची कथा यापूर्वी कुठेतरी पाहिल्याचा भास होता आणि क्षणात रणबीरच्या‘रॉक स्टार’ची आठवण येते. आयन एका श्रीमंत घरातला मुलगा असतो. पण वडिलांचा पारंपरिक व्यवसाय सांभाळण्याऐवजी त्याला गाण्यात अधिक रस असतो. तुझ्या आवाजात काहीही ‘दर्द’ नाही, असे आलिझा त्याला अगदी परखडपणे सुनावते. सोबतच खरा प्रेमभंग झाल्याशिवाय तुझ्या आवाजात‘दर्द’ येणार नाही, हेही  सांगते. कारण प्रेमभंगाचे दु:ख आलिझाने सोसलेले असते. यानंतर आयन-आलिझा फिरतात, मनसोक्त पार्ट्या करतात. अशाच एका पार्टीत आलिझाला तिचा पूर्व प्रियकर अली(फवाद खान) पुन्हा भेटतो आणि त्याच्यासोबत ती निघून जाते. अली आलिझावर प्रेम करतो, हे समजायला आयनला वेळ लागत नाही. तो तिच्या लग्नालाही पोहोचतो आणि गातो. या गाण्यात ‘दर्द’ असतो. आलिझाला तो बरोबर जाणवतो. पण आलिझा आयनला केवळ एक मित्र मानत असते. आलिझाच्या लग्नावरून परतानाच आयनला सबा भेटते. यानंतर आयनच्या प्रेमाचे काय होतं? आलिझा तिच्या नवºयासोबत आनंदी राहते वा नाही? चित्रपटाची कथा  ‘रॉकस्टार’ सारखी आहे वा नाही? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर तुम्हाला हा चित्रपटच बघावा लागले.चित्रपटाबद्दल सांगायचे तर करणच्या प्रत्येक चित्रपटात दिसणारा मेलोड्रामा, रोमान्स आणि सुपरहिट साँग्स या चित्रपटातही आहेत. अगदी सुंदर ग्लॅमरस लाईफस्टाईल, इजी कम इजी गो सेक्स, पार्टी, ड्रिंक्स, फॉरेन ट्रिप्स, अफेअर,  ब्रेकअप झाल्यानंतरही अगदी घनिष्ठ मैत्री ठेवणारे एक्स बॉयफे्रन्ड-गर्लफ्रेन्ड,  नोकरी-धंदा असले काहीही पाश नसलेले, प्रेमावर तत्त्वज्ञान झाडणारे प्रेमवीर असे (अनेकदा मनाला न पटणारे) सगळे सगळे करणच्या चित्रपटात असतेच असते. वास्तवापासून खूप दूर असणाºया या सर्व गोष्टी या चित्रपटातही अगदी तशाच आहेत. पण तरिही मेळ जमून न आल्याने विस्कटीतपणा जाणवतो. प्रेमभंगावरचे सततचे संवाद कंटाळवाणे वाटायला लागतात.चित्रपटाची सुरुवात चांगली होती. रणबीर आणि अनुष्काचे संवाद काही वेळ भारी वाटतात. पण नंतर त्यांचे एकमेकांप्रतीचे आकर्षण, मैत्री यावर अगदी कंटाळा येईपर्यंत चर्चा होते. चित्रपटाचा पहिला भाग अनुष्काच्या हास्यविनोदामुळे खिळवून ठेवतो. पण दुसºया भागात कथेतील गुंतागुत वाढत जाते.  पुढे पुढे मनाला पटणार नाहीत, अशी काही वळणं येतात. ते पाहून चित्रपट कधी संपतो नि कधी नाही, असे वाटायला लागते.खरे तर करणचे सगळे चित्रपट वास्तवापासून दूर जाणारे असतात. त्यात काहीही नवीन नाही. पण ‘ऐ दिल है मुश्किल’ वास्तवापासून अतीच दूर वाटतो. इतका की, त्यातील व्यक्तिरेखेशी प्रेक्षक कुठल्याही स्तरावर जोडला जाऊ शकत नाही. अभिनयाचे म्हणाल तर चित्रपटाचा पूर्ण भार रणबीरच्या खांद्यावर दिसतो. आयनच्या व्यक्तिरेखेत जीव ओतण्यात रणबीरने कुठलीही कसर सोडलेली नाहीयं, हे पदोपदी जाणवते. अनुष्काही तिची भूमिकेत फिट बसते. ऐश्वर्या आणि फवाद यांना मात्र चित्रपटात करण्यासारखे काहीच नाही. ऐश्वर्या ग्लॅमरस आहे. पण तिच्या वाट्याला आलेल्या भूमिकेत तिला करण्यासाठी काहीच वाव नाही. एकंदर काय तर माल-मसाला असूनही चित्रपट रडवा वाटतो.