Begum Jaan Review : विद्या बालनच्या दमदार अभिनयाने तारले ‘बेगम जान’ला!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2017 12:50 PM
आपल्यापैकी अनेकजण विद्या बालनच्या नवीन चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या बाबतीत उत्सुक आहोत. कारण विद्या बालनला तिच्या धाडसी, संवेदनशील आणि बिगर फिल्मी पात्र रंगविण्यासाठी ओळखले जाते. अशाच एका भूमिकेत ती ‘बेगम जान’ या चित्रपटात बघावयास मिळत आहे.
तऱ्हेवाईक बॉलिवूड चित्रपटाप्रमाणेच ‘बेगम जान’ सुद्धा गंभीर चित्रपट आहे. यात जेंडर पॉलिटिक्सचे प्रदर्शन दाखविण्यात आले आहे. यात रोमान्स, संगीत किंवा गमतीदारपणा अजिबात नसल्याने प्रेक्षकांचे लक्ष विचलित होत नाही. चित्रपटाचा सर्व भर मुख्य मुद्द्यांवरच आहे. कोठ्यातील मुलींच्या जीवनातील कडू-गोड गोष्टी, वैयक्तिक जीवन तसेच स्वातत्र्यांच्या आणि सुरक्षिततेच्या भोवती हा चित्रपट फिरत असतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बेगम जानच्या जीवनात तिला असलेली असुरक्षिततेची भीती एका टप्प्यावर नाहीशी होत असते. चित्रपटातील काही भाग ‘मिर्च मसाला’ या चित्रपटाशी साधर्म्य दाखवितात. कारण हा चित्रपट सत्ता, स्वातंत्र आणि लैंगिक अभिव्यक्ती या मुद्द्यांभोवती आहे. पटकथेमध्ये काही दोष आढळतात. त्यातील बरेच दृश्य कोठ्याबाहेर चित्रित करण्यात आले आहेत. काही दृश्य रजत कपूर आणि आशिष विद्यार्थीसोबत आहेत. दोघांनाही मुस्लीम लीग आणि भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसशी संबंधित दाखविण्यात आले आहे. विवेक मुश्रणने मास्टरजीची भूमिका साकारली आहे. पण त्याच्यासोबतची दृश्य दोषपूर्ण वाटतात. चित्रपटात असलेला हायडेसीबल ड्रामा आणि मध्यांतरानंतरचे ओरडणे थोडे कमी केले असते; तर चित्रपट सुसह्य झाला असता. विद्याने बेगम जान या पात्राला चांगलाच न्याय दिला आहे. तसेच पल्लवी शारदा हिने त्या कोठ्यातील एका मुलीची भूमिका निभावली आहे. तिनेही चांगली भूमिका साकारली आहे. एकंदरच तुम्ही गंभीर चित्रपट बघण्याच्या मुडमध्ये असाल तर हा चित्रपट नक्कीच पाहावा.
जान्हवी सामंतआपल्यापैकी अनेकजण विद्या बालनच्या नवीन चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या बाबतीत उत्सुक आहोत. कारण विद्या बालनला तिच्या धाडसी, संवेदनशील आणि बिगर फिल्मी पात्र रंगविण्यासाठी ओळखले जाते. अशाच एका भूमिकेत ती ‘बेगम जान’ या चित्रपटात बघावयास मिळत आहे. चित्रपटात ती स्पष्टोक्ती, बिंधास्त आणि वास्तववादी महिलेच्या भूमिकेत आहे. ‘बेगम जान’ हा चित्रपट बेगम जान या महिलेच्या भोवतीच फिरत असतो. ती एका कोठ्याची मालकीन असते. हा कोठा भारत-पाकिस्तानच्या सीमेवर असतो. जेव्हा भारत-पाकिस्तानमध्ये फाळणी होते तेव्हा हा कोठा अडसर ठरतो. कारण त्याठिकाणी हा कोठा पाडून नवीन चौकी उभारायची असते. बेगम जानला स्वातंत्र किंवा दोन देशांनी काय निर्णय घेतला याच्याशी काहीही देणेघेणे नसते. तिचा कुठल्याही सरकारला कोठा पाडण्यासाठी, तिथल्या मुलींना बाहेर काढण्यासाठी किंवा तिला तिथून हलविण्यासाठी प्रखर विरोध असतो. ती तिथल्या पोलीस अधिकाºयांना, राजाला आणि सरकारी अधिकाºयांना अजिबात जुमानत नाही. ती या सर्वांविरोधात लढायचा निर्णय घेते. कोठ्यातील ११ मुली आणि दोन पुरुषांना सोबत घेऊन ती व्यवस्थेला लढा देते.