Join us

Choked Movie Review: सिंकमधून नोटांची पुडकी येतात तेव्हा...; नोटबंदीच्या निर्णयावर अनुराग कश्यपचा हटके सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 3:07 PM

 सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. याचे कारण म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट बनला आहे. 

Release Date: June 05, 2020Language: हिंदी
Cast: सैयामी खेर, रोशन मॅथ्यू, अमृता सुश्राष, राजश्री देशपांडे
Producer: Director: अनुराग कश्यप
Duration: 2 hrsGenre:
लोकमत रेटिंग्स

अनुराग कश्यप प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. आता त्याचा नवा सिनेमा रिलीज झालाय. अर्थात चित्रपटगृहात नाही तर नेटफ्लिक्सवऱ ‘चोक्ड- पैसा बोलता है’ हे या सिनेमाचे नाव. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. याचे कारण म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट बनला आहे. अनुरागच्या या सिनेमात पती पत्नीच्या नात्यासोबत नोटबंदीची कथा गुंफली आहे. तेव्हा जाणून घेऊ या कसा आहे हा सिनेमा.

काय आहे कथाचोक्डची कथा सरिता पिल्लई (सैयामी खेर) आणि सुशांत पिल्लई (रोशन मॅथ्यू) या जोडप्याची कहाणी आहे. सुशांत कुठलेही काम करत नसल्याने सरिताच्या खांद्यावर घराची संपूर्ण जबाबदारी असते. सरिता एका बँकेत नोकरी करून घराचा गाडा हाकत असते. सुशांतच्या डोक्यावर काही कर्जही असते. अशात या जोडप्यात प्रेम कमी आणि भांडण जास्त असे चित्र असते़.घरासाठी स्वप्नांवर पाणी सोडलेली सरिता वैतागली असते. एका लहानशा घरात ती राहत असते. अशात एक दिवस सुशांत व सरिताच्या घरातील एक नाली चोक्ड होते आणि ती साफ करताना त्यातून निघू लागतात ती पाचशेच्या नोटांची बंडल. इतका पैसा पाहून सरिता हुरळून जाते. तिच्या स्वप्नांना नवे पंख फुटतात. पण अचानक सरकार नोटबंदीचा निर्णय जाहीर करते. सरिता बँकेत कॅशिअर असते. अशात सरिता काय निर्णय घेते, तिच्या स्वप्पांचे काय होते, या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा सिनेमा पाहावा लागेल.

अभिनय व दिग्दर्शनचोक्ड या सिनेमात सैयामी खेर आणि रोशन मॅथ्यू या दोघांचाही अभिनय शानदार आहे. सैयामीने तर कमाल केली आहे. सरिताची भूमिका तिने अतिशय उत्तम पद्धतीने जिवंत केली आहे. अमृता सुभाष आणि राजश्री देशपांडे यांनीही त्यांच्या वाट्याला भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. अनुराग कश्यपचे दिग्दर्शनही जबरदस्त आहे. पतीपत्नीचे नाते आणि नोटबंदी हे दोन वेगवेगळे विषय त्याने असे काही बेमालुम गुंफले आहेत की, चित्रपट पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही जागचे उठणार नाही. लॉकडाऊनमध्ये प्रेम आणि नोटबंदीची ही जुगलबंदी एकदा तरी पाहायलाच हवी.  

टॅग्स :अनुराग कश्यप