Join us

Delivery Boy Movie Review :आईपण भारी देवा!, कसा आहे प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रतापचा सिनेमा 'डिलिव्हरी बॅाय'

By संजय घावरे | Published: February 09, 2024 4:14 PM

Delivery Boy Movie Review: जाणून घ्या कसा आहे, प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप, अंकिता लांडे पाटील यांचा डिलिव्हरी बॉय चित्रपट

Release Date: February 09, 2024Language: मराठी
Cast: प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप, अंकिता लांडे पाटील, गणेश यादव
Producer: डेव्हिड नादरDirector: मोहसीन खान
Duration: दोन तास १० मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

>> संजय घावरे

आजच्या काळात सरोगसी हा विषय नवीन नाही. बऱ्याचदा चित्रपटात आलेल्या या विषयावर कथा रचताना गावाकडच्या गरीब महिलांचा ट्रॅक जोडून आईपण भारी देवाचा फिल देण्याचा प्रयत्न केला आहे. सरोगसीसाठी तयार करणारा नायकाद्वारे थोडी गंमत करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक मोहसीन खान यांनी केला आहे.

कथानक : रिअल ईस्टेट एजंट दिगंबर कानतोडे उर्फ दिग्याभाऊ आणि त्याचा मित्र चोच्या यांची ही गोष्ट आहे. अमृता देशमुख नावाची एक तरुण डॅाक्टर हॅास्पिटलसाठी बंगला बघण्यासाठी दिग्याकडे येते. दिग्या तिला बंगला दाखवतो. ज्या स्त्रियांना आईपण अनुभवता येत नाही त्यांना आईपणाचं सुख देण्याच्या विचाराने अमृता बंगल्यात ममता प्रजनन केंद्र सुरू करते. कमिशनच्या बदल्यात सरोगसीसाठी स्त्रियांना तयार करण्याचं काम दिग्या करतो. हे काम करताना आपण एक प्रकारचं सामाजिक कार्यही करत असल्याची जाणीव हळूहळू त्याला होते, पण काही अडथळे येतात.

लेखन-दिग्दर्शन : कथानकात नावीन्यपूर्ण काही नाही. सरोगसीचा मुद्दा १०-१५ वर्षांपूर्वी काहीसा नवीन होता. चित्रपटात नायक-नायिका असली की त्यांची लव्हस्टोरी असावी असा अट्टाहास बऱ्याच चित्रपटात असतो, पण इथे तसं काही न करणं कथानकाला पोषक ठरतं. लांबलचक दृश्ये आणि त्यासाठी घालवलेला वेळ कथानकाच्या प्रवाहात व्यत्यय आणतात. गावोगावी जाऊन सरोगसीसाठी स्त्रिया शोधणे, तिथून मार खाऊन पळ काढणे, सरोगसीची पद्धत समजावून सांगणे, अखेर गरजू स्त्रिया मिळणे या गोष्टी करताना काही उणिवा राहिल्या आहेत, पण त्याकडे दुर्लक्ष करता येऊ शकतं. 'भाऊचा स्वॅग भारी...' हे गाणं चांगलं झालं असून, प्रथमेश परबने छान डान्स केला आहे. 

अभिनय : काहीसा वेगळा लुक असलेला प्रथमेश परब यात आहे. दिग्याभाऊची व्यक्तिरेखा प्रचंड ताकदीनिशी साकारताना प्रथमेश कुठेही कमी पडलेला नाही. त्याला पृथ्वीक प्रतापने योग्य साथ दिल्याने दोघांची चांगली जोडी जमली आहे. अंकिता लांडेपाटीलनेही आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. गणेश यादवने पुन्हा एकदा खलनायक साकारला असला तरी या चित्रपटातील खलनायकी रंग काहीसा वेगळा आहे. सहाय्यक भूमिकांमधील सर्वच कलाकारांनी चांगली साथ दिली आहे.

सकारात्मक बाजू : अभिनय, गीत-संगीत, सिनेमॅटोग्राफी, संवादनकारात्मक बाजू : पटकथा, संकलन, दिग्दर्शन, लांबलचक दृश्येथोडक्यात काय तर चित्रपट फुल टू टाईमपास असल्याने प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रताप यांचा विनोदी अभिनय पाहायचा असेल तर एकदा चान्स घ्यायला हरकत नाही.

टॅग्स :प्रथमेश परब