तेलगू चित्रपट भागमतीचा हिंदी रिमेक दुर्गामती राजकीय भ्रष्टाचाराच्या अवतीभोवती फिरणारी एक हॉरर सस्पेन्स कथा आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन जी. अशोकने केली आहे, त्यांनीच तेलगू चित्रपटाचेही दिग्दर्शन केले आहे. भूमी पेडणेकरच्या दुर्गामती चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सगळीकडे चित्रपटाची खूप चर्चा झाली होती. चित्रपटाच्या ट्रेलरवर संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळत होत्या. एकीकडे भूमी पेडणेकरच्या अभिनयाचे कौतूक होत होते तर दुसरीकडे तिची तुलना भागमतीमध्ये प्रमुख भूमिकेत असलेल्या अनुष्का शेट्टी सोबत केली जात होती. त्यामुळे या चित्रपटाच्या रिलीजकडे सगळ्यांचे लक्ष होते. अखेर हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर रिलीज झाला आहे.
दुर्गामतीची सुरूवात होते जल संपदा मंत्री ईश्वर प्रसाद (अरशद वारसी)पासून जो लोकांना वचन देतो की जर मंदिरातील मूर्ती चोरणाऱ्यांना १५ दिवसात नाही पकडले तर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देईन. ईश्वर प्रसादच्या प्रामाणिकपणामुळे लोक त्याला देव मानत असते. दुसरीकडे तो सीबीआयच्या रडारवर असतो. सीबीआय सहआयुक्त सताक्षी गांगुली (माही गिल) आणि एसीपी अभय सिंग (जीशू सेनगुप्ता) मिळून ईश्वर प्रसादच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करायचा असतो.या प्लानअंतर्गत सताक्षी गांगुली आणि एसीपी अभय सिंग तुरूंगात कैद असलेल्या ईश्वर प्रसादची माजी पर्सनल सेक्रेटरी आईएएस चंचल चौहान (भूमी पेडणेकर)ला चौकशीसाठी बाहेर घेऊन जातात. चंचल आपल्या फियॉन्से शक्ती (करण कपाडिया)च्या मर्डरच्या गुन्ह्यात तुरूंगवास होतो. लोकांच्या नजरेपासून चौकशीसाठी सीबीआय तिला दुर्गामती हवेलीत घेऊन जाते. लोक म्हणतात की हवेलीमध्ये राणी दुर्गामतीची आत्मा वावरते. मात्र सीबीआय चंचलला तिथे काही दिवसांसाठी ठेवतात आणि चौकशी करतात. इथून गोष्टी बदलू लागतात. रात्र झाली की चंचलमध्ये राणी दुर्गामतीची आत्मा प्रवेश करते आणि ती पूर्णपणे बदलून जाते. मात्र कोण आहे ही राणी दुर्गामती आणि काय आहे तिची कथा? खरेच तिथे आत्मेचा वावर आहे की ही चंचलचा काही प्लान आहे. यासाठी चित्रपट पहावा लागेल.दुर्गामती तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. मात्र यात दाक्षिणात्य चित्रपटाची छाप पहायला मिळते जे हिंदी प्रेक्षकांना निराश करतो. दिग्दर्शक जी. अशोक यांनी चित्रपटातील संपूर्ण सीन एका भाषेतून दुसऱ्या भाषेत सादर केली आहे. मात्र हिंदी चित्रपटाच्या प्रेक्षकांची टेस्ट एकदम वेगळी आहे. त्यामुळे त्यांना चित्रपट पचनी पडत नाही. राणी दुर्गामती बनलेल्या भूमी पेडणेकरच्या डायलॉगच्या मागे दिले गेलेल्या बॅकग्राउंड स्कोअर आणि इको कंटाळवाणा वाटतो. चित्रपटाची कथा इंटरेस्टिंग आहे पण संवाद आणि दिग्दर्शन तितके चांगले झाले नाही. जास्त दृश्यातील चित्रपटातील संवाद उपदेश वाटतात. अभिनयाबद्दल सांगायचं तर भूमी पेडणेकर एक उत्तम अभिनेत्री आहे पण या चित्रपटातील तिचे काम मनावर छाप उमटवित नाही. काही दृश्यांमध्ये तिचा अभिनय इंप्रेस करतो. तर माही गिलच्या वाट्याला फक्त दोन-चार डायलॉग्स शिवाय काहीच आलेले नाही. त्यातही बंगाली-हिंदी मिळून दिलेले संवाद ऐकताना खटकतात. जीशू सेनगुप्ताचा अभिनय प्रभावी वाटतो. करण कपाडीयाचा छोटासा रोल आहे आहे. कुलदीप ममालियाची सिनेमॅटोग्राफी कथेला प्रभावी बनवते.