जितेंद कुमार
गोविंदा आणि वरुण शर्माच्या कॉमेडीची जुगलबंदीने सजलेल्या ‘फ्रायडे’ची कथा कमकुवत असूनही खूपच हसवते. अभिषेक डोगराने गोविंदासोबत ‘फ्रायडे’ बनविला असून ज्यात एक सिंपल कथानक आहे, मात्र ट्रीटमेंट वेगळी आहे.याला गोविंदाचा कमबॅक चित्रपट म्हणणे चुकीचे ठरणार नाही. यात त्याच्यासोबत अभिनेता वरुण शर्मादेखील आहे. या अगोदर अभिषेकने राजकुमार राव आणि सोनम कपूरसोबत 'डॉली की डोली' हा चित्रपट बनविला होता. ज्याला सरासरी रिस्पॉन्स मिळाला होता, चित्रपटाची कास्टिंगदेखील योग्य आहे.
दिल्लीमध्ये सेल्समनचे काम करणारा राजीव छाबडा (वरुण शर्मा)ची ट्रॅजेडी ही आहे की, तो शुद्ध पाणी प्युरिफायर विकतो, मात्र कोणताही ग्राहक मिळत नाही. ज्यामुळे तो नाराज होतो. मात्र एकेदिवशी त्याची भेट थिएटर आर्टिस्ट गगन कपूर (गोविंदा) शी होते. गगन विवाहित आहे आणि त्याची गर्लफे्रंड बिंदु (दिगांगना सूर्यवंशी) आहे आणि बिंदुही स्वत: विवाहित आहे, मात्र दोघांचे अफेयर असते. दोघेही आपले अफे यर लपवतात मात्र नेमके काय होते जेव्हा राजीव छाबडा आपले प्युरिफायर विकायला गगन कपूरच्या घरी जातो.
चित्रपटाची कथा गोविंदाला समोर ठेवून लिहण्यात आली आहे, सोबतच वरुण शर्माचीही भूमिका त्याला सूट होते. गोविंदाने आपल्या कॉमेडीच्या टायमिंगने चित्रपटास दमदार बनविले आहे. चित्रपटाची कथा जरी कमकुवत आहे मात्र दिग्दर्शक अभिषेक डोगराने यात हसविण्याचे अनेक पैलू टाकले आहेत जे परिस्थितीनुसार अगदी परफेक्ट आहेत. अभिषेक डोगराचे डायरेक्शन उत्तम आहे. ब-याचदा तर अशी परिस्थिती येते की, आपण खूपच जोरजोराने हसू लागतो आणि त्यातच डोळ्यात पाणीदेखील येऊ लागते. हा चित्रपट म्हणजे प्रसंगनिष्ठ कॉमेडी आहे, ज्यामुळे ब-याच चांगल्या कलाकारांनी आपल्या सहभागाने चित्रपटास प्रभावी बनविले आहे. विजेंद्र काला आणि राजेश शर्मा यांच्या प्रभावी अभिनयाने चित्रपटात जीव ओतला गेला आहे. तर दिगांगना सूर्यवंशीचे कामही चांगले आहे.