हर्षवर्धन पाठकसंपूर्ण जग २ आॅक्टोबरला अहिंसा दिवस साजरा करते. यादिवशी सत्य, अहिंसा या त्यांच्या विचारांचा पुरस्कार केला जातो. २ मार्चला त्यांच्या विचारांचा प्रसार करणारा ‘हमने गांधी को मार दिया’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. नसीम सिद्दीकी दिग्दर्शित हा चित्रपट गांधींचे विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात असमर्थ ठरेल, असे वाटतेय.खरंतर आत्तापर्यंत बॉलिवूडमध्ये महात्मा गांधींच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट तयार करण्यात आले आहेत. या चित्रपटांचा जगभरात चांगलाच प्रसार, प्रचार झाला. दिग्दर्शक नसीम सिद्दीकी यांचा ‘हमने गांधी को मार दिया’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल की नाही? याबाबत वेगवेगळी मते व्यक्त केली जात आहेत. नसीम यांना असे वाटते की, स्वातंत्र्याच्या काळात देशात जशी परिस्थिती होती, काहीसे असेच वातावरण सध्या जगात पहावयास मिळत आहे. तरीही हा चित्रपट जनतेला प्रेम आणि शांततेचा संदेश देत आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात सुरू असलेल्या अनागोंदी आणि अव्यवस्थेबद्दलचे चित्रण चित्रपटाच्या सुरूवातीला दाखवण्यात आले आहे. हिंदू आणि मुस्लिम समाजात भयानक असंतोष पसरलेला दिसतो. कैलाश सिंह (जतीन गोस्वामी) त्याची पत्नी सुधा (समीक्षा भटनागर) आणि मुलगीसोबत कोलकातामध्ये राहत असतो. दोन समाजातील वादामुळे कैलाशच्या मिलला आग लागते. ज्यानंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब पैशांसाठी व्याकूळ होऊन जाते. त्यावेळी कैलाश निर्णय घेतो की, तो काही काळासाठी तो त्याच्या गावी जाऊन राहणार आहे. त्याच्या या परिस्थितीसाठी तो महात्मा गांधी यांना दोषी मानतो. रेल्वेतून प्रवास करताना त्याची भेट दिवाकर (सुब्रत दत्ता) यांच्यासोबत होते. दिवाकर गांधीजींच्या नीती-विचारांना मानणारा असतो. ज्यामुळे कैलाशला दिवाकर आवडत नाही. परंतु, प्रवासादरम्यान असे काही होते की, ज्यामुळे कैलाशचे विचार बदलून जातात. अभिनयाच्या बाबतीत विचार केला तर जतीन गोस्वामी आणि समीक्षा भटनागर यांनी चांगल्या व्यक्तिरेखा सांभाळल्या आहेत. सुब्रत दत्ता यांची भूमिकाही उत्कृष्ट दर्जाची होती. मात्र, तरीही चित्रपटाचा सारांश भाग लक्षात घेता काही ठिकाणी चित्रपट कंटाळवाणा वाटतो. नसिम सिद्दीकी हे प्रत्येक ठिकाणी प्रेक्षकांची निराशा करतात. थोडक्यात काय तर, हमने गांधी को
मार दिया हा चित्रपट पैसा वसूल चित्रपट नाही.