Join us

hichki movie review : राणी मुखर्जीचा दमदार कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 10:21 AM

राणी मुखर्जीने हिचकी या एका आगळ्या वेगळ्या विषयावरच्या चित्रपटाद्वारे पुनरागमन केले. फ्रंट ऑफ द क्लास या हॉलिवूडच्या चित्रपटावर आधारित हिचकी हा चित्रपट आहे.

Release Date: March 23, 2018Language: हिंदी
Cast: राणी मुखर्जी, सुप्रिया पिळगांवकर, हुसैन दलाल, हर्ष मयार, जन्नत झुबैर रहमानी
Producer: आदित्य चोप्रा, मनीष शर्माDirector: सिद्धार्थ पी मल्होत्रा
Duration: ११८ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स
प्राजक्ता चिटणीसप्रत्येक व्यक्तीमध्ये कोणतीही ना कोणती कमतरता असते. पण आपल्या कमतरतेवर मात करत काही लोक यश मिळतात. आपल्या कमतरतेलाच आपले बलस्थान बनवणाऱ्या एका मुलीची कथा हिचकी या चित्रपटात पाहायला मिळते. तसेच कोणलाही त्यांच्या आर्थिक कुवतीमुळे कमी लेखू नये हा देखील संदेश हिचकी हा चित्रपट आपल्याला नकळतपणे देतो. राणी मुखर्जीने हिचकी या एका आगळ्या वेगळ्या विषयावरच्या चित्रपटाद्वारे पुनरागमन केले. फ्रंट ऑफ द क्लास या हॉलिवूडच्या चित्रपटावर आधारित हिचकी हा चित्रपट आहे. नयनाला (राणी मुखर्जी) टॉरेंट सिंड्रोम हा आजार लहानपणापासून असतो. त्यामुळे तिला नेहमीच तिरस्काराचा सामना करावा लागतो. तिचे वडील (सचिन पिळगांवकर) हे देखील तिचा या गोष्टीमुळे तिच्यावर सतत चिडत असतात. तसेच शाळेत असताना वर्गातील मुले देखील तिच्यावर हसत असतात. तिच्या सततच्या उचक्यांमुळे संपूर्ण वर्गाला त्रास होतो असे सांगत तिला १२ शाळांमधून काढले जाते. त्यानंतर १३ व्या शाळेतील तिचे सर (विक्रम गोखले) तिला या सगळ्या परिस्थितावर मात करायला शिकवतात. त्यांच्यामुळे नयना चांगले शिक्षण घेते. तिच्या या गुरूंमुळे तिलादेखील शिक्षिका बनायचे असते. पण अनेक शाळांमध्ये मुलाखत देऊन देखील तिला नोकरी मिळत नाही. तिच्या या आजारामुळे ती कधीच शिक्षिका बनू शकत नाही असेच सगळ्यांचे मत असते. पण ती ज्या शाळेत शिकलेली असते, त्या शाळेत तिला अचानक नोकरी मिळते. राईट टू एज्युकेशनच्या द्वारे महानगरपालिकेतील काही मुलांना या शाळेत शिकण्याची परवानगी मिळालेली असते. या मुलांना शिकवण्याची जबाबदारी नयनावर येते. ही मुले अतिशय मस्तीखोर असतात. नयनाने शाळा सोडवावी यासाठी ते अनेक प्रयत्न करतात. पण नयना त्यांना कशाप्रकारे सुधारते आणि नयना आणि या मुलाचे नाते कशाप्रकारे उलगडत जाते हे दिग्दर्शक सिद्धार्थ पी मल्होत्रा यांनी अतिशय सुंदररित्या मांडले आहे. हिचकी या चित्रपटात नयना आणि तिच्या विद्यार्थ्यांचे नाते तसेच तिचे तिच्या आईसोबत (सुप्रिया पिळगांवकर) आणि भावासोबत (हुसैन दलाल) असलेले नाते खूपच चांगल्याप्रकारे मांडण्यात आले आहे. तसेच नयनाची शिकवण्याची पद्धतदेखील खूपच रंजक आहे. मुलांना चार भिंतीच्या वर्गात न शिकवता ती त्यांना प्रात्यक्षिकं देऊन शिकवते ही गोष्ट खूपच चांगल्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे. पण चित्रपट पाहात असताना चित्रपटात पुढे काय घडणार याचा अंदाज आपल्याला सुरुवातीपासूनच लागतो. त्यामुळे आपल्याला काही वेगळे पाहायला मिळत नाही. पण तरीही चित्रपटातील प्रत्येक प्रसंग खुबीने रंगवण्यात आले असल्याने हा चित्रपट रटाळवाणा होत नाही. अभिनयासाठी राणी मुखर्जीचे जितके कौतुक करावे तितके कमी आहे. राणी नयना ही भूमिका अक्षरशः जगली आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. राणीसोबतच तिच्या विद्यार्थ्यांच्या भूमिकेत असणारे हर्ष मयार, जन्नत झुबैर रहमानी यांनी देखील खूप चांगला अभिनय केला आहे. चित्रपट काही वेळा संथ वाटत असला तरी एकंदर हा चित्रपट प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करतो.